ई-क्लास जमिनीवर अतिक्रमण केल्यास कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 04:23 AM2021-06-20T04:23:45+5:302021-06-20T04:23:45+5:30

अंढेरा : येथून जवळच असलेल्या सुरा येथेच शासकीय ई-क्लास जमिनीवरील अतिक्रमण पोलीस संरक्षणात काढल्यानंतरही पुन्हा अतिक्रमण करू पाहणाऱ्यांना आवरा ...

Action in case of encroachment on E-Class land | ई-क्लास जमिनीवर अतिक्रमण केल्यास कारवाई

ई-क्लास जमिनीवर अतिक्रमण केल्यास कारवाई

Next

अंढेरा : येथून जवळच असलेल्या सुरा येथेच शासकीय ई-क्लास जमिनीवरील अतिक्रमण पोलीस संरक्षणात काढल्यानंतरही पुन्हा अतिक्रमण करू पाहणाऱ्यांना आवरा अन्यथा आत्मदहन करतो, असा निर्वाणीचा इशारा सुरा येथील दत्तात्रय ईजळे यांनी दिला. या इशाऱ्याने प्रशासन खडबडून जागे झाले. दरम्यान, १८ जून राेजी गटविकास अधिकारी श्रीकृष्ण इंगळे यांनी भेट देऊन आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. अतिक्रमण केल्यास कारवाई करण्यात येणार असल्याचे फलक लावले.

शासकीय जमिनीवर अतिक्रमणसाठी प्रसिद्ध असलेल्या तालुक्यातील सुरा गावात दोन महिन्यांपूर्वी प्रशासनाने पोलीस संरक्षणात ऐतिहासिक ठरलेले अतिक्रमण काढले होते. मात्र जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने तहसीलदार सारिका भगत यांनी पोलीस संरक्षणात हटविण्यात आलेल्या जमिनीवर पुन्हा अतिक्रमण होत आहे यावर ठोस कारवाई करा अन्यथा आत्मदहन करतो, असा इशारा गावातील दत्तात्रय बाबूराव इजळे यांनी गट विकास अधिकारी यांना एका निवेदनाद्वारे दिला होता आत्मदहनाचा सदर इशाऱ्यानंतर प्रशासन ॲक्टिव्ह मोडवर आले आणि गट विकास अधिकारी श्रीकृष्ण इंगळे, विस्तार अधिकारी सुरडकर पोलीस कर्मचारी घेऊन सुरा तेथे पोहोचले. यावेळी इजळे यांच्याशी चर्चा केली. अतिक्रमण स्थळी जाऊन अतिक्रमण करू पाहणाऱ्यांना तंबी देत शासकीय जमिनीवर अतिक्रमण करसाल तर कायदेशीर कारवाईस तयार रहा म्हणून निर्वाणीचा इशारा देणारे फलक लावण्यात आले. दरम्यान, आंदोलनकर्ते इजळे यांनी प्रशासनाने अतिक्रमणधारकांवर केलेल्या कारवाईबद्दल समाधान व्यक्त केला व आत्मदहन करणार नाही असे पोलीस प्रशासनाला लिहून दिले आहे.

सुरा येथे काही शेतकऱ्यांना महसूल विभागाने भाडेपट्टे दिले आहे. अतिक्रमण संदर्भात सुरा येथे भेट देऊन कार्यकर्त्यांशी चर्चा केली व त्यांना आत्मदहनपासून प्रवृत्त केले. काही लोकांनी केलेले अतिक्रमण काढले.

श्रीकृष्ण इंगळे, गटविकास अधिकारी, पंचायत समिती देऊळगाव राजा

Web Title: Action in case of encroachment on E-Class land

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.