शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra News: भाजपला एकनाथ शिंदेंच हवेत उपमुख्यमंत्री, काय आहे कारण?
2
महत्त्वाच्या खात्यांसाठी महायुतीत लॉबिंग; शिंदेसेना, अजित पवारांना कुठली खाती हवीत?
3
BREAKING: राज कुंद्राच्या घरी ईडीचे धाडसत्र, कार्यालयातही झाडाझडती
4
उपमुख्यमंत्रिपद, पक्षाचं प्रमुखपद की केंद्रीय राजकारण...; एकनाथ शिंदेंचं पुढचं पाऊल काय?
5
मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांचं नाव जवळपास निश्चित; बैठकीनंतर सूत्रांची माहिती
6
"लॉरेन्स बिश्नोई गँगसाठी अमेरिका..."; शार्प शूटरचा खळबळजनक खुलासा
7
भाजपच्या अभूतपूर्व यशाचे ‘रहस्य’ काय?; 'सागर' बंगल्यावर पडद्यामागे घडलेल्या गोष्टी
8
नाना पाटेकरांना कशाची भीती वाटते? म्हणाले, "ना मृत्यूची ना कोणा व्यक्तीची पण...."
9
'गली'त Glenn Phillips चा 'सुपरमॅन' अवतार; हवेत उडी मारत पकडला अफलातून कॅच (VIDEO)
10
दोन वर्षात ११०० हून अधिक बनावट बॉम्बच्या धमक्या, संपूर्ण आकडेवारी पाहून बसेल धक्का!
11
राज्य सरकारकडून वक्फ बोर्डाला १० कोटींचा निधी वर्ग, जीआर निघाला; भाजपाकडून खुलासा
12
लिस्टिंगवरच जबरदस्त फायदा: पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल; ₹२२० वर आला शेअर
13
मुख्यमंत्रि‍पदाचा निर्णय झाला का? बैठकीनंतर एकनाथ शिंदेंनी दिली महत्त्वाची माहिती
14
मशालीमुळे उडाला भडका, आगीचे लोळ उठले, ३० जण होरपळले  
15
देशात सर्वाधिक टोल वसुली कुठल्या राज्यात होते? २४ वर्षात सरकारने किती कमाई केली? गडकरींनी दिली माहिती
16
Stock Market Updates: शेअर बाजारात मोठी तेजी, सेन्सेक्स २०० अंकांनी वधारला लाइफ इन्शुरन्स शेअर्स वधारले
17
१५० व्या कसोटीत Joe Root वर ओढावली नामुष्की! WTC मध्ये विराटपेक्षा अधिक वेळा पदरी पडला भोपळा
18
शेख हसीना चिन्मय कृष्ण दास यांच्या समर्थनात उतरल्या; तात्काळ सुटकेची मागणी केली
19
'ट्रम्प परत येताहेत'; बांगलादेशातील हिंदुवरील हल्ल्यांवर मूर यांचे विधान
20
अस्थिर बाजारात गुंतवणूकीची भीती वाटतेय? 'या' ५ पर्यायांचा विचार करा; टेन्शनशिवाय मिळेल प्रॉफिट

ई-क्लास जमिनीवर अतिक्रमण केल्यास कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 4:23 AM

अंढेरा : येथून जवळच असलेल्या सुरा येथे शासकीय ई-क्लास जमिनीवरील अतिक्रमण पोलीस संरक्षणात काढल्यानंतरही पुन्हा अतिक्रमण करू पाहणाऱ्यांना आवरा, ...

अंढेरा : येथून जवळच असलेल्या सुरा येथे शासकीय ई-क्लास जमिनीवरील अतिक्रमण पोलीस संरक्षणात काढल्यानंतरही पुन्हा अतिक्रमण करू पाहणाऱ्यांना आवरा, अन्यथा आत्मदहन करतो असा निर्वाणीचा इशारा सुरा येथील दत्तात्रय इजळे यांनी दिला. या इशाऱ्याने प्रशासन खडबडून जागे झाले. दरम्यान, १८ जून राेजी गटविकास अधिकारी श्रीकृष्ण इंगळे यांनी भेट देऊन आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. अतिक्रमण केल्यास कारवाई करण्यात येईल असा फलक लावण्यात आला आहे.

शासकीय जमिनीवर अतिक्रमणसाठी प्रसिद्ध असलेल्या तालुक्यातील सुरा गावात दोन महिन्यांपूर्वी प्रशासनाने पोलीस संरक्षणात ऐतिहासिक ठरलेले अतिक्रमण काढले होते, मात्र जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने तहसीलदार सारिका भगत यांनी पोलीस संरक्षणात हटविण्यात आलेले अतिक्रमण होत आहे. यावर ठोस कारवाई करा, अन्यथा आत्मदहन करतो असा इशारा गावातील दत्तात्रय बाबूराव इजळे यांनी गटविकास अधिकारी यांना एका निवेदनाद्वारे दिला होता. या इशाऱ्यानंतर प्रशासन ॲक्टिव्ह मोडवर आले आणि गटविकास अधिकारी श्रीकृष्ण इंगळे, विस्तार अधिकारी सुरडकर पोलीस कर्मचारी घेऊन सुरा तेथे पोहोचले. यावेळी इजळे यांच्याशी चर्चा केली. अतिक्रमणस्थळी जाऊन अतिक्रमण करू पाहणाऱ्यांना तंबी देत शासकीय जमिनीवर अतिक्रमण करसाल तर कायदेशीर कारवाईस तयार राहा म्हणून निर्वाणीचा इशारा देणारे फलक लावण्यात आले. दरम्यान, आंदोलनकर्ते इजळे यांनी प्रशासनाने अतिक्रमणधारकांवर केलेल्या कारवाईबद्दल समाधान व्यक्त केला व आत्मदहन करणार नाही, असे पोलीस प्रशासनाला लिहून दिले आहे.

सुरा येथे काही शेतकऱ्यांना महसूल विभागाने भाडेपट्टे दिले आहे. अतिक्रमणसंदर्भात सुरा येथे भेट देऊन कार्यकर्त्यांशी चर्चा केली व त्यांना आत्मदहनापासून प्रवृत्त केले. काही लोकांनी केलेले अतिक्रमण काढले.

श्रीकृष्ण इंगळे, गटविकास अधिकारी, पंचायत समिती, देऊळगाव राजा