- ब्रम्हानंद जाधव लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : रब्बी हंगामासाठी पीक विमा योजना लागू करण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर बोगस पीक विमा काढणाऱ्यांवर कारवाईचे संकेत कृषी विभागाकडून देण्यात आले आहेत. शेतकºयाचे नाव चुकीचे असेल, पीक पेरा नोंदी बोगस आढळून आल्यास जिल्हा संनियंत्रण समितीच्या मार्गदर्शनानुसार फौजदारी गुन्हे दाखल करण्याची जबाबदारी संबंधित विमा कंपनीवर सोपविण्यात आलेली आहे. त्यामुळे पीक विम्यासाठी बोगस शेतकरी दाखवाणाऱ्यांना चाप बसणार आहे.यंदा अतिपावसामुळे खरीप हंगामाचे नुकसान झाले. राज्यात रब्बी हंगामाच्या पेरणीचाही टक्का वाढत नसल्याचे चित्र आहे. अनेक शेतात पाणीच असल्याने रब्बी हंगामातील उत्पादनाची अनिश्चितता निर्माण झाली आहे. त्यामुळे यंदा रब्बी हंगामाचा पीक विमा जास्त उतरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. परंतू यामध्ये बोगस शेतकºयांची भीती पीक विमा कंपन्यांना आहे. दी ओरिएण्टल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या कंपनीकडे प्रधानमंत्री पीक विमा योजना अंतर्गत खरीप २०१८ चे काम सोपविण्यात आले होते. दरम्यान, या कपंनीने केलेल्या छाननीदरम्यान पीक विमा योजनेत राज्यातील जवळपास १५ हजारावर शेतकरी बोगस असल्याचे आढळून आले होते. त्यामध्ये काही शेतकºयांनी एकापेक्षा अधिक वेळा विमा भरला, तर काही शेतकºयांनी दिलेली कागदपत्रे खोटी असून त्यात काही तफावतही आढळून आली होती.पीक विमा योजनेत बोगस प्रकरणाच्या कथीतस्तरावर कृषी विभागाकडून फौजदारी कारवाईचे पाऊल उचलले आहे. राज्यात २०१९-२० मधील रब्बी हंगामासाठी पीक विमा योजना लागू करण्यात आली आहे. त्यामध्ये ज्या सर्व्हे नंबरसाठी व क्षेत्रासाठी पीक विमा काढण्यात आलेला आहे, त्या क्षेत्राच्या सात/बारा उताºयावर शेतकºयाचे नाव नसणे, सात/बारा उताºयावर नोंद क्षेत्रापेक्षा अधिकच्या क्षेत्रासाठी विमा काढणे, बोगस सातबारा व पीक पेरा नोंदीच्या आधारे पीक विम्याची बोगस प्रकरणे आढळून आल्यास दोषींवर जिल्हा सनियंत्रण समितीच्या मार्गर्शनानुसार फौजदारी गुन्हे दाखल करण्याची जबाबदारी संबंधित विमा कपंनीची राहणार आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत कुठेच बोगस पीक विमा प्रकरण आढळून आलेले नाही. रब्बी हंगामासाठी पीक विमा योजना लागू करण्यात आली आहे. ही सर्व प्रक्रिया पारदर्शक पार पाडली जाईल.-नरेंद्र नाईक,जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, बुलडाणा.