‘स्वाभिमानी’च्या आंदोलनानंतर मिळाले साखळी ग्रामवासीयांना ‘ट्रान्सफॉर्मर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2017 01:10 PM2017-11-07T13:10:14+5:302017-11-07T13:10:44+5:30

साखळी येथील गावकºयांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पश्चिम विदर्भ प्रमुख राणा चंदन यांच्या नेतृत्वात महावितरण गाठून आंदोलन केले. याची दखल घेत अधिकाºयांनी ट्रान्सफार्मर गावकºयांच्या हवाली करुन दिला.

After the movement of 'Swabhimani', villagers get the 'Transfarmer' | ‘स्वाभिमानी’च्या आंदोलनानंतर मिळाले साखळी ग्रामवासीयांना ‘ट्रान्सफॉर्मर’

‘स्वाभिमानी’च्या आंदोलनानंतर मिळाले साखळी ग्रामवासीयांना ‘ट्रान्सफॉर्मर’

Next

बुलडाणा : तालुक्यातील साखळी येथील शेतकºयांना ट्रान्सफार्मर बदलून देण्यासाठी टाळाटाळ करणाºया अधिकाºयाच्या विरोधात ६ नोव्हेंबर २०१७ रोजी साखळी येथील गावकºयांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पश्चिम विदर्भ प्रमुख राणा चंदन यांच्या नेतृत्वात महावितरण गाठून आंदोलन केले. याची दखल घेत अधिकाºयांनी ट्रान्सफार्मर गावकºयांच्या हवाली करुन दिला.
या आंदोलनामुळे महावितरणची चांगलीच दमछाक झाली. काही काळ वातावरण तणावाचे निर्माण झालेले होते. यामुळे साखळी येथील गावकºयांना ट्रान्सफार्मर मिळाल्यामुळे त्यांच्या चेहºयावर आनंदाचे वातावरण निर्माण झाले. यापुढे कोणत्याही शेतकºयाला वेठीस धरुन ट्रान्सफार्मर न दिल्यास शेतकºयांचा उद्रेक होईल, याला जबाबदार संबंधीत प्रशासन राहील, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भ प्रमुख राणा चंदन यांनी दिला आहे. यावेळी त्यांचे सोबत डॉ.ज्ञानेश्वर टाले, राहुल दांदडे, शेख साजीद, कडूबा मोरे, गणेश चौधरी, राजु चौधरी यांच्यासह साखळी येथील गावंकरी व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे  कार्यकर्ते हजर होते.

Web Title: After the movement of 'Swabhimani', villagers get the 'Transfarmer'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.