शेगाव (बुलढाणा) :
काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो पदयात्रेचे सकाळीच बुलढाणा जिल्हा हद्दीत आगमन झाले. वरखेड येथील वारकऱ््यांच्या रिंगण सोहळ्यानंतर पदयात्रा शेगाव येथे पाेहचणार आहे. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री गजानन महाराज संस्थांनला भेट देत ते श्रींचे दर्शनही घेणार आहेत. दुपारी चार वाजता राज्यातील महत्त्वाची असलेल्या दुसऱ््या जाहिर सभेला सुरूवात होणार आहे. त्यासाठी राज्यासह इतर राज्यातून आलेल्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांची शेगावात प्रचंड गर्दी झाली आहे.
राज्यातील नांदेड येथे आगमन झाल्यानंतर दुसरी जाहिर सभा तसेच राज्यातील समारोपाकडे पदयात्रा निघत असल्याने शेगावातील ही सभा अंत्यत महत्त्वपूर्ण समजली जात आहे. यापार्श्वभूमीवर संतनगरीत सुरक्षेच्या दृष्टिने सभा स्थळ, श्री गजानन महाराज मंदिर परिसर व शहरातील विविध ठिकाणच्या राहुल गांधीचा मुक्काम, निवास, भोजन व्यवस्था
करण्यात आली आहे. - संस्थानला भेट देणारे गांधी घराण्यातील प्रथम व्यक्तीशेगाव येथील श्रींच्या संस्थानमध्ये दोन दशकापूर्वी भारताचे तत्कालिन उपराष्ट्रपती भैरवसिग शेखावत, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, शरद पवार, नितिन गडकरी, उध्दव ठाकरे,राज ठाकरे, हिमाचल,त्रिपुराचे राज्यपाल तसेच नुकतेच महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी येऊन गेलेले आहेत. त्यानंतर गांधी घराण्यातील व्यक्ती प्रथमच संत नगरीत शेगावात येऊन श्रींचे समाधी दर्शन घेऊन घेणार असल्याने राहुल गांधी यांच्या आगमनाची उत्सुकता आहे. त्या पाश्र्वभूमीवर श्री गजानन महाराज संस्थान मध्ये विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. - शेगावचे संस्थान सर्वधर्मसमभाव जोपासते
शेगावचे श्री संस्थान हे सर्वधर्मसमभाव जोपासत आहे. विविध सेवाभावी प्रकल्प संस्थानकडून जनहितार्थ राबविले जातात. त्यामुळेच शेगाव येथील श्री गजानन महाराज संस्थानचा सर्वदूर नावलौकिक आहे.- वरखेड येथे रिंगण सोहळा
पदयात्रेच्या भोजनाची व्यवस्था शेगाव-बाळापूर मार्गावरील वरखेड फाटा येथे केली आहे. त्याठिकाणी खामगाव मतदारसंघाचे नेते ज्ञानेश्वरदादा पाटील यांनी २१ फुटी विठ्ठलाची मूर्ती उभारली आहे. तसेच पंढरपूरच्या वारीदरम्यान वारकऱ््यांचे होत असलेल्या रिंगणाचे प्रात्यक्षिक त्याठिकाणी साकारले जात आहे. त्यामध्ये ६०० वारकरी एकाचवेळी सहभागी होणार आहेत. राहुल गांधी यांच्यासमोर रिंगण होणार आहे. त्यासाठीची रंगित तालिमही सातत्याने झाली आहे.