किरीट सोमय्या यांच्या प्रतिमेला जोडे मारून आंदोलन
By ब्रह्मानंद जाधव | Published: July 18, 2023 06:29 PM2023-07-18T18:29:44+5:302023-07-18T18:29:56+5:30
भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांचा कथित व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर याचे पडसाद थेट विधिमंडळात उमटले आहेत.
बुलढाणा : भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांचा कथित व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर याचे पडसाद थेट विधिमंडळात उमटले आहेत. बुलढाणा जिल्ह्यातही शिवसेनेने (उबाठा) जालिंदर बुधवत यांच्या नेतृत्वात या घटनेचा तीव्र निषेध केला. किरीट सोमय्या यांच्या प्रतिमेला १८ जुलै रोजी जोडे मारून निषेध आंदोलन करण्यात आले.
येथील संगम चौकामध्ये भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी किरीट सोमय्या यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. जालिंदर बुधवत म्हणाले, सोमय्याने जे पेरले तेच उगवले. जो व्हिडीओ समोर आला आहे, या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन तत्काळ कारवाई झाली पाहिजे; अन्यथा, शिवसेना रस्त्यावर उतरून आंदोलन तीव्र करेल, असा इशाराही जालिंदर बुधवत यांनी दिला आहे. यावेळी मुंबई येथील युवासेना कार्यकारिणी सदस्य रूपेश कदम, युवा सेना विभागीय सचिव सागर देशमुख, भरत सांबरे, युवासेना जिल्हा प्रमुख नंदू कऱ्हाडे, शुभम पाटील, लखन गाडेकर, हेमंत खेडेकर, डॉ. अरुण पोफळे, प्रकाश डोंगरे, सचिन परांडे, विजय इतवारे, हरिदास कड, सुधाकर आघाव, अशोक गव्हाणे, दीपक पिंपळे, अमोल जुंबड, रूपेश लडके यांच्यासह शिवसेना युवासेनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.