यानुषंगाने ऑनलाईन पध्दतीने अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री ना.बच्चू कडू, आमदार गोपीकिशन बाजोरिया, अमोल मिटकरी, कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले, कार्यकारी परिषद सदस्य गणेश कंडारकर, मोरेश्वर वानखेडे, अर्चना बारब्दे यांच्यासह शास्त्रज्ञ, संशोधन संचालक कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते. स्व. वसंतराव नाईक यांचा जन्मदिवस डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाव्दारे ''''कृषी दिन'''' म्हणून दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. परंतु कोविड-१९ चा प्रादुर्भाव लक्षात घेता हा कार्यक्रम विदर्भातील १३ जिल्ह्यातील कृषी विज्ञान केंद्रावरील शास्त्रज्ञ, अधिकारी व प्रगतिशील शेतकऱ्यांच्या उपस्थीतीत ऑनलाइन पार पडला. बुलडाणा येथील कृषी विज्ञान केंद्रात कृषी विद्यापीठाचे कार्यकारी परिषद सदस्य तथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विनायक सरनाईक, कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ सी. पी. जायभाये यांची उपस्थीती होती. महाराष्ट्र शासनाव्दारे सन्मानित चिखली तालुक्यातील कृषिभूषण पुरस्कार प्राप्त व स्व.वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार प्राप्त शेतकरी महिला अनिता रामसिंग पवार, रामसिंग पवार व इतर प्रगतिशील शेतकऱ्यांचा सन्मान सरनाईक यांच्या हस्ते करण्यात आला. अकोला कृषी विद्यापीठात तसेच कृषी विद्यापीठ सलग्न विदर्भात असलेल्या कृषी विज्ञान केंद्रात उपस्थीत मान्यवरांच्या हस्तेसुद्धा प्रगतिशील शेतकऱ्यांचा सन्मान कृषी दिनी करण्यात आला. यावेळी बुलडाणा येथे कृषी विज्ञान केंद्राचे सी. पी. जायभाये, डॉ.अनिल तारु, डॉ. रोहित चव्हाण यांच्यासह अधिकारी व शेतकरी उपस्थित होते.
कृषी पुरस्कारप्राप्त शेतकऱ्यांचा सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2021 4:23 AM