शेतीसोबत हिरवे स्वप्नही खरडले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2019 12:30 PM2019-07-03T12:30:17+5:302019-07-03T12:30:28+5:30

शेतकऱ्यांना तर खरीप हंगामाची पेरणी करण्यासाठी शेतात मातीच उरली नसल्याने शेतीसोबत हिरवे स्वप्नही खरडल्याचे विदारक चित्र आहे.

Agriculture land scrapped by rain in Buldhana | शेतीसोबत हिरवे स्वप्नही खरडले!

शेतीसोबत हिरवे स्वप्नही खरडले!

Next

- ब्रम्हानंद जाधव 
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: अतिपावसाने जिल्ह्यात काही ठिकाणच्या शेतजमीनी खरडून गेल्या आहेत. अनेक शेतकऱ्यांना तर खरीप हंगामाची पेरणी करण्यासाठी शेतात मातीच उरली नसल्याने शेतीसोबत हिरवे स्वप्नही खरडल्याचे विदारक चित्र आहे. खरडून गेलेल्या जमीनीच्या नुकसानाचा सर्वे करण्याच्या सुचना सर्व तहसील कार्यालयांना आपत्ती विभागाकडून देण्यात आल्या आहेत.
मृृग नक्षत्र पुर्णत: कोरडा गेला. त्यानंतर मृग व आद्राच्या जोडावर जिल्ह्यात पावसाला सुरूवात झाली. सुरूवातीला तुरळक ठिकाणी झालेल्या पावासने शेतकरी सुखावले. परंतू २५ ते २९ जूनच्या दरम्यान, जिल्ह्यात दमदार पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यातून उगम असलेल्या पैनगंगा नदीला चार वेळा पूरही आला. तर इतरही छोट्या-मोठ्या नद्यांना पूर येऊन गेला. अतिपावसामुळे नदी पात्राच्या काठावरील अनेक ठिकाणच्या शेतजमीनी खरडून गेल्या. शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व मशागतीचे कामे करून खरीप हंगामाच्या पेरणीसाठी शेती सज्ज केली होती. पेरणीसाठी गुळगुळीत केलेल्या शेतातील मातीच या पावसाने वाहून गेली. कोलवड, तांदुळवाडी, हतेडी, अंभोडा, झरी, दहिद बु., दहिद खु., देऊळघाट, दत्तपुर, उमाळा, पळसखेड, इस्लामपूर, गोंधनखेड, गिरडा, मढ व इतर पैनगंगा नदीच्या काठावरील आणि पैनगंगेला लागून असलेल्या अनेक नाल्याना आलेल्या पुराने हजारो हेक्टरवरील सुपीक जमीन खरडुन गेली. या नैसर्गीक संकटाने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.
अद्यापपर्यंत जिल्हा आपत्ती विभागाकडे नुकसानाचा अहवाल प्राप्त झालेला नाही. त्यामुळे आपत्ती विभागाने जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयांना पत्र पाठवून पावसाने जमीनी खरडून गेल्याने झालेल्या नुकसानाचा अहवाल तातडीने पाठविण्याच्या सुचना दिल्या आहेत. त्यानुसार सध्या खरडलेल्या जमीनीचे सर्वेक्षण कृषी सहाय्यक व तलाठी यांच्यामार्फत महसूल मंडळकाडून सुरू झाले आहेत.

७० गावांना फटका बसल्याचा अंदाज
अतिपावसामुळे शेतजमीनी खरडून गेल्याने शेतकºयांचे नुकसान झाले असून, यामध्ये पाच हजार हेक्टर क्षेत्राच्यावर जमीन बाधीत झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या पावसाचा जवळपास ७० गावांना फटका बसल्याचा अंदाज कृषी विभागाकडून व्यक्त होत असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

कृषी सहाय्यक व तलाठी यांच्यामार्फत शेतजमीनी खरडून गेल्याचा सर्वे सुरू आहे. लवकरच नुकसानाचा अहवाल प्राप्त होईल. यामध्ये ७० गावांचा समावेश असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
- संतोष शिंदे,
तहसीलदार, बुलडाणा.

Web Title: Agriculture land scrapped by rain in Buldhana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.