आधीच डिझेल, पेट्रोलच्या दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांच्या नाकीनऊ आले असताना घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरच्या दरात कमालीची वाढ झाली आहे. महिनाभराआधी गॅस सिलिंडर २५ रुपये व पंधरा दिवसांआधी पुन्हा २५ रुपयांनी महागले होते. आता पुन्हा सिलिंडरच्या दरात वाढ झाली आहे.
सध्या ९०५ रुपयांना मिळतो सिलिंडर
सध्या सिलिंडर ९०५ रुपयांना मिळत आहेत. त्यामुळे एकीकडे जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढत असताना घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरच्या दरात होणारी वाढ सर्वसामान्यांना आर्थिक ताण देणारी ठरत आहे. सिलिंडरचे दर कमी करण्याची मागणी गृहिणींकडून करण्यात येत आहे.
शहरातील एकूण ग्राहक
शहरात सध्या ५२ हजार गॅसधारक ग्राहक आहेत, तर प्रमुख वितरक असून त्यांच्याकडील घरपोच सिलिंडर पोहोचविणारे ७० डिलिव्हरी मॅन आहेत.
असे वाढले दर...
दिनांक दरवाढ सिलिंडरचे दर
१ डिसेंबर १० ७०१
१ जानेवारी ३० ७३१
१ फेब्रुवारी २३ ७५४
१ मार्च १५ ७६९
१ एप्रिल १२ ७८१
१ मे ३१ ७९३
१ जून ०६ ८२४
१ जुलै २५ ८५५
१ ऑगस्ट २५ ८८०
१ सप्टेंबर २५ ९०५