पाणीटंचाई निवारणासाठी जलसंपदा विभागातील अभियंत्यानी वर्गणीतून उभारला १० लाख रुपयांचा निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2019 06:12 PM2019-05-21T18:12:25+5:302019-05-21T18:12:32+5:30
बुलडाणा: विदर्भ जलसंपदा अभियंता सेवा संस्थे अंतर्गत जलसंपदा विभागातील अभियंत्यानी वर्गणीतून १० लाख रुपयांचा निधी जमा केला आहेत.
बुलडाणा: दुष्काळातही काहीजण पाण्यासाठी दातृत्व जपत आहेत. विदर्भ जलसंपदा अभियंता सेवा संस्थे अंतर्गत जलसंपदा विभागातील अभियंत्यानी वर्गणीतून १० लाख रुपयांचा निधी जमा केला आहेत. पाणीटंचाई निवारणार्थ विदर्भातील ११ जिल्ह्यातून हा निधी उभारण्यात आला असून विदर्भातील जलसंपदा विभागाला दुष्काळात मायेचा पाझर पुटल्याचे दिसून आले.
पाणीटंचाईची दाहकता दिवसेंदिवस वाढतच आहे. जिल्ह्यातही २२६ गावांमध्ये २३८ टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. पाणीटंचाईचे संकट लक्षात घेऊन विदर्भातील जलसंपदा विभागाने सामाजिक उपक्रम हाती घेतला आहे. जलसंपदा विभागातील विदर्भातील ११ जिल्ह्यामधील अभियंत्यांनी वर्गणी करुन १० लाख रुपयांचा निधी उभारला आहे. टंचाई ग्रस्त गावांसाठी सामाजिक बांधीलकी म्हणून टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यासाठी हा निधी खर्च करण्यात येत आहे. या कामासाठी विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ नागपुर विभागाचे कार्यकारी संचालक अविनाश सुर्वे यांनी चळवळीला चालना देण्यासाठी तीन लाखाची भरीव निधी देऊन योगदान दिले आहे. विदर्भ जलसंपदा अभियंता सेवा संस्थेअंतर्गत टँकरद्वारे पिण्याचे पाणी देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यांच्या पुढाकारामुळे दुष्काळात गावकºयांची तहान भागविली जात आहे.
तीन गावांना पाणी पुरवठा
या निधीतून बुलडाणा जिल्ह्यातील पळसखेड नाईक, साखळी खुर्द व अकोला जिल्ह्यातील दोनखेडा या दुष्काळ ग्रस्त गावांना टँकरद्वारे पाणी पुरवठा करुन तीन गावांची तहान भाविली जात आहे. रोज या गावात चार फेºयातुन १८ हजार लिटर पाणीपुरवठा केला जातो. साखळी खुर्द येथे सहा फेºयातून २७ हजार लिटर पाणीपुरवठा केला जातो. जलसंपदा विभागाचे कार्यकारी संचालक अविनाश सुर्वे, मुख्य अभियंता जलतारे अधिक्षक अभियंता अंकुर देसाई, कार्यकारी अभियंता कन्ना, उपकार्यकारी अभियंता क्षितीजा गायकवाड व जलसंपदा विभागाचे कर्मचारी यासाठी प्रयत्न करीत आहे.
पगारातून दिला निधी
पाणीटंचाई निवारणार्थ शासनस्तरावरून टँकर, विहिर अधिग्रहण यासारखे अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. मात्र सामाजिक बांधीलकीमधून जलसंपदा विभागाच्या अधिकारी कर्मचाºयांनीही पुढाकार घेतल्या दिसून येत आहे. विदर्भ जलसंपदा अभियंता सेवा संस्थे अंतर्गत जलसंपदा विभागातील अधिकाºयांना आपल्या पगारातून पाणीटंचाई निवारणार्थ उपाययोजना करण्यासाठी निधी उभा केला आहे. टंचाईच्या पृष्टभूमीवर विदर्भातील अभियंत्याचा हा उपक्रम आदर्श ठरत आहे.