अण्णाभाऊ साठेंचे साहित्य परिवर्तनाला दिशा देणारे : राम डहाके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 04:21 AM2021-07-22T04:21:58+5:302021-07-22T04:21:58+5:30
साहित्यसम्राट, थोर समाजसुधारक अण्णाभाऊ साठे यांनी संयुक्त महाराष्ट्राची चळवळ लोकमानसात रूजविण्यासह उपेक्षितांच्या अंतरंगाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला. त्यांचे साहित्य ...
साहित्यसम्राट, थोर समाजसुधारक अण्णाभाऊ साठे यांनी संयुक्त महाराष्ट्राची चळवळ लोकमानसात रूजविण्यासह उपेक्षितांच्या अंतरंगाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला. त्यांचे साहित्य साहित्य परिवर्तनाला दिशा व चालना देणारे ठरेल, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव राम डहाके यांनी केले.
चिखली तालुक्यातील दहिगाव व महिमळ येथे ९ जुलै स्मृतिदिनानिमित्त अण्णाभाऊ साठेंना अभिवादन करण्यात आले. यावेळी ते बालेत हाेते. आपल्या अजरामर साहित्यातून समाजसुधारण्याचे महान कार्य अण्णाभाऊ साठेंनी केले, असे प्रतिपादन तालुका काँग्रेसचे अध्यक्ष समाधान सुपेकर यांनी केले. यावेळी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव राम डहाके, चिखली तालुका काँग्रेस अध्यक्ष समाधान सुपेकर, सरपंच संजय येवले, संतोष वांजोल, भारत नरवाडे, नारायण नरवाडे, आप्पा येवले, रमेश गवई, पांडुरंग खरात, माधव खरात, देविदास लहाने, तुकाराम खरात, ज्ञानेश्वर गवई, बेबीताई खरात, अलकाताई खरात, आसराबाई परसे, सविताताई खरात, गजानन लहाने, अशोक लहाने, ज्ञानेश्वर खरात, दत्ता खरात, तेजपाल लहाने, भानुदास लहाने आदींसह इतर ग्रामस्थ उपस्थित हाेते.