बुलडाणा: जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. १० आॅगस्ट रोजी आणखी ६४ पॉझिटिव्ह आढळून आले असून २५९ अहवाल कोरोना निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १ हजार ९७१ रुग्णसंख्या झाली आहे.प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण ३२३ अहवाल १० आॅगस्ट रोजी प्राप्त झाले आहेत. यापैकी २५९ अहवाल कोरोना निगेटिव्ह आले असून, ६४ अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील ४१ व रॅपिड टेस्टमधील २३ अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून ८४ तर रॅपिड टेस्टमधील १७५ अहवालांचा समावेश आहे. पॉझीटीव्ह आलेले अहवालामध्ये नांदुरा शहरात आठ, मेहकर येथे तीन, डोणगांव येथे तीन, जळगाव जामोद तालुक्यातील वडशिंगी येथे एक, आडोळ ता. जळगांव जामोद तीन, चिखली येथे सहा, शिंदी हराळी ता. चिखली दोन, बुलडाणा येथील शरद कला कॉलेज जवळ चार, जिल्हा रूग्णालय एक, बालाजी नगर सुंदरखेड एक, इंदिरा नगर एक, शिवाजी नगर एक, सुवर्णा नगर एक, मोताळा तालुक्यातील खेडी पान्हेरा एक, बुलडाणा तालुक्यातील पिंपळगांव सराई येथे पाच, मोहोज येथे सात, मूळ पत्ता वालसावंगी जि. जालना एक, खामगांव एक, जुना फैल तीन, गजानन कॉलनी एक, राठी प्लॉट चार, सती फैल दोन, मलकापूर दोन, सुलतानपूर एक, धामणगाव बढे एक असे एकूण ६४ रूग्ण आढळले आहे.
बुलडाणा जिल्ह्यात आणखी कोरोना ६४ पॉझिटिव्ह; रुग्णसंख्या १ हजार ९७१
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2020 11:19 AM