- ब्रम्हानंद जाधव
बुलडाणा: दुष्काळाची दाहकता वाढलेली असताना दुधाळ जनावरांसाठी आवश्यक असलेल्या सरकीच्या ढेपीचेही भाव व्यापाºयांनी गगनाला भिडवले आहेत. दोन महिन्यात ढेपीच्या ६० किलोच्या पोत्यामागे सुमारे ७०० रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे. त्यामुळे पशुपालकांना ढेप खरेदी करणे परवडत नसल्याने पश्चिम विदर्भातील २२ लाख ५० हजार दुधाळ जनावरांची भूक वाळलेल्या चाºयावर भागवली जात आहे. परिणामी दुग्धोत्पादनालाही फटका बसत आहे. दुभत्या जनावरांच्या खाद्यपदार्थाकडे विशेष लक्ष दिल्यास दूध वाढण्यासाठी मोठा फायदा होतो. त्यामध्ये प्रथिनेयुक्त खाद्य जर त्यांना मिळाले तर गायी, म्हशींचे आरोग्य चांगले राहते. परंतू सध्या दुष्काळी परिस्थितीमुळे प्रथिनेयुक्त खाद्य किंवा हिरवा चारा मिळणे दुरापास्त झाले आहे. त्यातही वेगवेगळ्या खाद्यांचे भाव मोठ्या प्रमाणावर वाढलेले दिसून येत आहेत. दुधाळ जनावरांसाठी सर्वात जास्त सरकीच्या ढेपची विक्री पश्चिम वºहाडात होते. पशुखाद्य शास्त्रानुसार दुभत्या जनावरांना खुराक म्हणून सरकीची ढेप दिवसाकाठी एक ते दीड किलो देणे आवश्यक असते. सरकीची ढेप दुधाळ जनावरांना दिल्यास दुधात वाढ होऊन गुरांची भूकही चांगल्या प्रकारे भागविल्या जाते. त्यासाठी खामगाव येथे तयार होणारी ढेप सर्वत्र प्रसिद्ध असून खामगाव येथून जिल्ह्याबाहेरही ढेपची निर्यात केली जाते. फेब्रुवारीमध्ये ढेपीच्या ६० किलोच्या एका पोत्यासाठी १२०० रुपये मोजावे लागत होते. मात्र गत दोन महिन्यात यामध्ये ७०० रुपयांची वाढ झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सध्या ढेपीच्या ६० किलोच्या एका पोत्यासाठी १ हजार ९०० रुपये लागत आहेत. तर हिरवा चाराही दुधाळ जनावरांना देणे अवघड झाले आहे. याचा परिणाम म्हणून मिळणारे दूधही कमी झाल्याचे दिसून येते. यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक गायी-म्हशीअमरावती विभागामध्ये एकूण २२ लाख ५० हजार ५० गायी व म्हशींची संख्या आहे. त्यामध्ये सर्वाधिक गायी-म्हशी यवतमाळ जिल्ह्यात दिसून येतात. यवतमाळमध्ये एकूण ६ लाख ८८ हजार ५०० त्यापाठोपाठ बुलडाणा जिल्ह्यात ५ लाख ६७ हजार ७३३ गायी-म्हशींची संख्या आहे. अमरावती जिल्ह्यात ५ लाख १२ हजार ६०, अकोला जिल्ह्यात २ लाख ४० हजार १९५ व वाशिम जिल्ह्यात २ लाख ४१ हजार ५६२ गायी-म्हशी आहेत. बोंडअळीचा डंख सरकीच्या ढेपेवरमागीलवर्षी कापरीवर पडलेल्या बोंडअळीचा डंख सरकीच्या ढेपे दिसून येत आहे. राज्यात गतवर्षी ४२ लाख हेक्टर क्षेत्रापर्यंत बीटी कापसाची लागवड करण्यात आली होती. त्यात २० जिल्ह्यांत बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने सुमारे ५ लाखावर शेतकºयांचे नुकसान झाले होते. बोंडअळीमुळे कपाशीचे उत्पादन घटले परिणामी सरकीच्याही उत्पादनावर फटका बसला. सरकीची आवक कमी झाल्याने सरकीच्या ढेपेचे भाव वाढले आहेत.