नांदुरा शहरात सर्वेक्षणासाठी २३ डॉक्टरांची नियुक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2020 11:59 AM2020-07-13T11:59:44+5:302020-07-13T11:59:53+5:30
२३ डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांना शिक्षकही मदत करणार आहेत
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदुरा : शहरात कोरोनोचा प्रसार झपाट्याने वाढत असल्याने कोरोनाची श्रृखला तोडण्यासाठी घराघरात सर्वेक्षण करण्याचा निर्णय नगर पालिकेने घेतला. त्यासाठी २३ डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांना शिक्षकही मदत करणार आहेत. घरोघर सर्वेक्षण करण्यासाठीचे साहित्य नगर पालिकेकडून डॉक्टरांना दिल्याची माहिती रविवारी देण्यात आली.
सर्वेक्षण मोहिमेत नगराध्यक्षा रजनी अनिल जबरे शहराच्या प्रमुख म्हणून काम पाहतील. तर प्रत्येक नगरसेवक हा त्या वार्डसमितीचा प्रमुख आहे. तसेच कोरोना काळात सेवा देणारी प्रत्येक वार्डाची समिती तयार करण्यात आली आहे, अशी माहिती नगराध्यक्षा जवरे, मुख्याधिकरी डॉ. आशिष बोबडे, तहसीलदार राहुल तायडे यांनी नगर पालीका सभागृहात नगरसेवकांना १२ जुलै दिली. घरोघर सर्वेक्षणाकरीता लागणारे अत्यावश्यक साहित्यही नगर पालिकेने दिले आहे. डॉक्टरांच्या पथकामध्ये डॉ. विजयसिंह मोहता, डॉ. जुगल चांडक, डॉ. विनायक कोल्हे, डॉ. नदिम अहमद, डॉ. संदीप डवंगे, डॉ. सत्यजित गव्हाळ, डॉ. आशिष देशमुख, डॉ. नितीन राठोड, डॉ. अमोल हिंगे, डॉ. मनोज डोफे, डॉ.संजय नाफडे, डॉ. प्रविण भोपळे, डॉ. प्रकाश टावरी, डॉ. सागर अग्रवाल, डॉ. विशाल बंड, डॉ. संजय इंगळे, डॉ. झेनुअल हक, डॉ. आबीद, डॉ. राजेंद्र चौधरी, डॉ. कल्पेश एकडे, डॉ. अरुण रेवागडे, या डॉक्टरांची सर्वेक्षणाकरीता नेमणुक करण्यात आली आहे. त्या-त्या प्रभागाचे नगरसेवक त्यांना मदत करणार आहेत. तसेच प्रत्येक वार्डात समिती सदस्य ही या डॉक्टरांना मदत करतील. तसेच २३ शिक्षक डॉक्टरांसोबत घरोघर सर्वेक्षण करुन सर्व माहिती गोळा करणार आहेत.