लाेणार काेविड सेंटरमध्ये १०० बेडची व्यवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:35 AM2021-04-20T04:35:45+5:302021-04-20T04:35:45+5:30
लोणार : शहर व तालुक्यात काेराेना रुग्णांची संख्या वाढत असल्याने स्थानिक काेविड सेंटर हाउसफुल झाले आहे. याविषयी लाेकमतने ...
लोणार : शहर व तालुक्यात काेराेना रुग्णांची संख्या वाढत असल्याने स्थानिक काेविड सेंटर हाउसफुल झाले आहे. याविषयी लाेकमतने वृत्त प्रकाशित करताच त्याची दखल घेत आमदार संजय रायमुलकर यांनी स्वखर्चातून काेविड सेंटरमध्ये १०० बेडची व्यवस्था केली आहे.
लोणार तालुक्यातील एकमेव असलेल्या लोणी रोडवरील कोवीड सेंटर सध्या कोरोना रुग्णांच्या गर्दीने हाऊसफुल झाले आहे. या केंद्राची क्षमता ५० ते ६० रुग्णांची असताना जवळपास १०० रुग्ण दाखल झाले आहेत. क्षमतेपेक्षा अधिक रुग्ण दाखल झाल्याने आराेग्य कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त ताण आला आहे. लोणार कोविड सेंटर हाऊसफुल असे वृत्त लोकमतने प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल घेत आ. डाॅ. संजय रायमुलकर यांनी कोरोना रुग्णांसाठी स्वखर्चाने १०० बेडची व्यवस्था केली आहे. एखाद्या अत्यावश्यक रुग्णाला भरती करण्यासाठी बेड उपलब्ध होत नाही. त्यामुळे आशा रुग्णांना वाचविण्यासाठी साधणे अपुरी पडत असल्याने रुग्णांना वाचविण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे. काेराेना रुग्णांची संख्या दिवसेेंदिवस वाढत असली तरी नागरिकांमध्ये गांभीर्य नसल्याचे चित्र आहे़
कोविड सेंटरसाठी मागील वर्षी व यावर्षी कोट्यवधी रुपायांचा निधी मिळवूण दिला. यापुढेही ज्या काही सुविधा अपुऱ्या असतील त्या पूर्ण करण्याचे काम लोकप्रतिनिधी म्हणून करणार आहे. अजूनही बेडची आवश्यकता असल्यास ते पुरविण्यात येतील.
डाॅ. संजय रायमुलकर,
आमदार, मेहकर विधानसभा