खामगावात क्वारंटिन केलेल्यांना अहवालाची प्रतिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2020 11:04 AM2020-07-21T11:04:16+5:302020-07-21T11:04:34+5:30
क्वारंटिन केलेल्या व्यक्तींचे अहवाल उशिराने प्राप्त होत असल्याने त्यांना हॉटेल खर्चाचा भूर्दंड पडत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : खामगाव शहरातील प्रतिष्ठितांना कोरोनाचा संसर्ग झाल्याने त्यांच्या संपर्कात आलेल्या अनेकांना क्वारंटिन करण्यात आले. त्यांनी हॉटेल, लॉजमध्ये राहण्याची सोय केली. मात्र, त्यांचे अहवाल प्राप्त होण्यास विलंब होत असल्याचा प्रकार घडत आहे. त्याचवेळी इतरांचे अहवाल तातडीने येत असल्याचेही स्पष्ट होत असल्याचे अनेक प्रकार उघड झाले आहेत.
बालाजी प्लॉट भागातील किराणा दुकान मालकाच्या संपर्कात आलेले पाच व्यक्ती पॉझिटिव्ह आल्या आहेत. त्या परिसरात निर्जंतुकीकरण किंवा इतर प्रतिबंधात्मक उपाययोजना अद्यापही करण्यात आलेल्या नाहीत. त्याचवेळी शहरातील रूग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर ते थेट अकोला, नागपूर येथेच धाव घेत आहेत. शासकीय रूग्णालयात सोयीसुविधांचा अभाव असल्याने रूग्णांना इतर शहरांमध्ये धाव घ्यावी लागत आहे. खामगावातील इतर १४ जणही रविवारी रात्री पॉझिटिव्ह आले आहेत.
अहवालास विलंब
खामगावातील क्वारंटिन केलेल्यांसह इतर रूग्णांचे अहवाल १६ तारखेपासून अद्यापही प्राप्त झालेले नाहीत. तर १७ तारखेला पिंपळगाव येथील अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामध्ये संबंधित अधिकाऱ्याच्या संपर्कातील ५ व्यक्ती आहेत. त्यापैकी क्वारंटिन केलेल्या व्यक्तींचे अहवाल उशिराने प्राप्त होत असल्याने त्यांना हॉटेल खर्चाचा भूर्दंड पडत आहे.
दोन बँकांच्या १८ जणांची तपासणी
दोन व्यापारी बँकांमध्ये कोरोना रूग्णांच्या संपर्कात आलेल्या १२ व्यक्तींची तपासणी हेऊनही त्यांना अहवालाबाबत माहिती देण्यात आली नाही.त्यांना शहरातील एका लॉनमध्ये क्वारंटिन केले आहे.