कोरोना प्रतिबंधात्मक उपायांची जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:36 AM2021-04-23T04:36:38+5:302021-04-23T04:36:38+5:30
धाड: जामठी, शेकापूर गट ग्रामपंचायतीच्यावतीने १९ एप्रिलला गावात कोरोना प्रतिबंधात्मक उपायांची जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. गावातून लाँगमार्च काढून कोरोनाबाबत ...
धाड: जामठी, शेकापूर गट ग्रामपंचायतीच्यावतीने १९ एप्रिलला गावात कोरोना प्रतिबंधात्मक उपायांची जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. गावातून लाँगमार्च काढून कोरोनाबाबत जनजागृती करण्यात आली. ‘घरी रहा, सुरक्षित रहा’, असा संदेश या रॅलीतून देण्यात आला.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व यंत्रणा युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे. ग्रामीण भागात सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत, सदस्य, ग्रामसेवक, तलाठी, आशा, अंगणवाडीसेविकाही जनजागृती करत आहेत. त्यामुळे ग्रामस्थांना धैर्य मिळत आहे. दरम्यान, १९ एप्रिलला राष्ट्रवादी कॉँग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी कॉँग्रेस पार्टी कामगार सेलचे मनोज दांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली जामठी, शेकापूर गट ग्रामपंचायतीच्यावतीने गावात लॉंगमार्च काढून जनजागृती करण्यात आली. रथ, ऑडिओ क्लीप, घोषवाक्य व पोस्टर हातात घेऊन कोरोन विषाणूसंदर्भात जनजागृती करून गावातील नागरिकांना घरातच राहण्याचे आवाहन केले. शेकडो नागरिक विविध शहरांतून गावांकडे परतले आहेत. या पार्श्वभूमीवर बाहेरून आलेल्या व्यक्तींवर नजर ठेवण्याबरोबरच गावात निर्जंतुकीकरण फवारणी, स्वच्छता, पाणी शुद्धिकरण, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बाहेरून आलेल्या व्यक्तींचे सर्वेक्षण आदी कामे ग्रामपंचायत करत आहेत. कोरोना संसर्गापासून संरक्षणासाठी जामठी गावात दवंडी, बॅनर, लाऊडस्पीकर, हँडबिल व प्रत्यक्ष घरोघरी जाऊन जनजागृती करून ग्रामस्थांनी घाबरून न जाता काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या सामजिक उपक्रमात मनोज दांडगे, ग्रामसेवक शिंदे, सरपंच बिलाल गायकवाड, कौतिकराव नरोटे, ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी, निर्मला ताई तायडे, आशासेविका, अंगणवाडीसेविका, आरोग्यसेवक जाधव, पोलीस पाटील रामकृष्ण तायडे, रामेश्वर तायडे, जक्का सेट, मनोहर तायडे, संजय तायडे, रमेश तायडे, अजय तायडे, गणेश तायडे, शेषराव तायडे, संतोष दांडगे, गजानन तायडे, भगवान मारोती तायडे, परश्राम तायडे, कैलास रावलकर, गणेश रावळकर, उमेश दांडगे, अमोल चित्ते, पिंट्टू जाधव, रवींद्र तायडे, बाळासाहेब तायडे, प्रकाश तायडे आदींची उपस्थिती होती. दरम्यान, शासनाने लावलेल्या कलम १४४ नुसार नियम पाळून हा कार्यक्रम घेण्यात आला.