- ब्रम्हानंद जाधव
बुलडाणा: शेतकऱ्यांना वेळेवर पीक कर्ज मिळावे, त्यांच्या अडचणी दूर व्हाव्या, यासाठी गावोगावी पीक कर्ज मेळावे घेण्यात येत आहेत. तर दुसरीकडे पीक कर्ज देणे सोडुन बँकाकडून शेतकºयांकडे कर्ज वसुलीसाठी तगादा लावला जात आहे. काही राष्ट्रीयीकृत बँकांनी अनेक थकबाकीदार शेतकºयांना नोटीस पाठवून बँकेस तारण दिलेल्या मालमत्तेचा ताबा घेण्याचा इशारा दिला आहे. दुष्काळ व खरीप पेरणीच्या तोंडावर थकबाकीदार शेतकºयांच्या मालमत्तेवर बँकांचा डोळा असल्याने शेतकरी अडचणी सापडले आहेत. खरीप हंगामासाठी लागणाºया खत, बियाण्यांचा खर्च पीक कर्जाच्या भरवश्यावरच केला जातो. पेरणीसाठी जिल्ह्यातील बहुतांश शेतकºयांची भीस्त ही बँकेकडून मिळणाºया पीक कर्जावर असते. जिल्ह्यात यंदा ३ लाख ३४ हजार शेतकºयांना १ हजार ७७३ कोटी ७७ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट आहे. दरम्यान, गेल्या दोन महिन्यापासून पीक कर्ज वाटपास सुरूवात झाली आहे. परंतू अद्यापही अनेक शेतकरी पीक कर्जापासून वंचीतच आहेत. पीक कर्जासाठी शेतकºयांना अडचणी येऊ नये, यासाठी प्रशासनाकडून पीक कर्ज मेळावे घेतले जात आहेत. तसेच प्रत्येक १५ दिवसाआड एकदा पीक कर्ज वाटपाचा आढावा यंत्रणेकडून घेतला जात आहे. जिल्ह्यात आतापर्यंत अवघ्या ५ टक्क्यापर्यंतच पीक कर्ज वाटप झाल्याची माहिती आहे. गत वर्षी ३४.१५ टक्के पीक कर्ज वाटप संपूर्ण हंगामात झाले होते. त्यामुळे यंदा पीक कर्जाचा टक्का वाढविण्यासाठी प्रशासकीय पातळीवरुन जोरदार प्रयत्न होत असतानाच दुसरीकडे बँकाकडून शेतकºयांना वेठीस धरण्याचा प्रकार सुरू असल्याची ओरड शेतकºयांमधून होत आहे. बँकेने पीक कर्ज वाटप करून शेतकºयांना दुष्काळात धीर देण्याऐवजी त्यांच्यावर वसुलीचा तगादा लावल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त दिसून येत आहेत. विदर्भ कोकण ग्रामीण बँकेसह जिल्ह्यातील काही बँकांनी थकबाकीदार शेतकºयांना नोटीस पाठवूण कारवाईचा इशारा दिला आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.
शेतकऱ्यांना दिली २५ जूनची ‘डेडलाईन’दुष्काळ व पेरणीसाठी खत, बियाण्यांची जुळवाजुळव करण्याचे दिवस असताना शेतकºयांना बँकेकडून थकबाकी रक्कम भरण्यासाठी नोटीस पाठविण्यात आलेल्या आहेत. विदर्भ कोकण ग्रामीण बँकेने थकबाकी रक्कम भरण्यासाठी शेतकºयांना २५ जूनची डेडलाईन दिली आहे. कर्जाची रक्कम भरण्यास दिरंगाई झाल्यास बँकेस तारण दिलेल्या मालमत्तेचा बँकेस ताबा घेऊन पुढील कारवाई करण्यात येईल, असे निर्देश विदर्भ कोकण ग्रामीण बँक मेहकर शाखेच्या वरिष्ठ शाखा प्रबंधकांनी दिले आहेत.