सावधान! मोबाइलचे व्यसन वाढते आहे
By admin | Published: April 20, 2015 10:37 PM2015-04-20T22:37:02+5:302015-04-20T22:37:02+5:30
खामगाव शहरातील सर्वेक्षण; मोबाइलशिवाय लोकांना करमत नाही.
खामगाव : दोन सेकंदाला मोबाइल फोन दिसेनासा झाला तर अनेक जण अस्वस्थ होतात. त्यांची एकाग्रता भंग पावते. मोबाइल परत सापडायला जितका उशीर लाग तो तितकी त्यांची चिडचिड वाढत जाते. ही चिडचिड खरं म्हणजे एक आजार आहे. मनुष्य तंत्रज्ञानाच्या अतिआहारी गेल्यामुळे पारंपरिक आजारांबरोबर काही नव्या आजारांना निमंत्रण मिळत आहे. त्यातलाच हा एक आजार आहे. मोबाइल फोन, सोशल मीडिया व संगणकाच्या अतिरेकी वापरामुळे कान, डोळे, पाठ व मेंदूच्या समस्यांबरोबरच काही मानसिक समस्याही निर्माण होत आहेत. असे असेल तर सावधान ! तुम्हाला मोबाइलचे व्यसन जडलेय. खामगाव शहरात रविवारी केलेल्या प्रातिनिधीक सर्वेक्षणात ही बाब समोर आली असून, लोकांना आ ता मोबाइलचे व्यसन चांगलेच लागले असल्याचे स्पष्ट झाले आहे. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईटच. तंत्रज्ञान वाईट नाही, त्याचा र्मयादित वापर आपल्याच हातात आहे; मात्र त्याचा अतिरेकी वापर तुमच्या आरोग्यावर विपरित परिणाम घडवू शकतो. वाढत्या मोबाइलच्या वापरामुळे अनेक जण आभासी जगात अधिक वावरतात. त्यांचे अँडिक्शन वाढते. अतिरेक झाल्यास आत्मविश्वास कमी होऊन न्यूनगंडाची भावना निर्माण होते. कोणाचा मोबाइल किती महाग, किती अ पग्रेड आहे, याची सतत तुलना होत असल्याने असूया निर्माण होऊन लालसा वाढ ते.