बिबी ग्रामीण रुग्णालयात सिरिंज, टीटी इंजेक्शन व आय.व्ही.सेटचा तुटवडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2017 01:40 PM2017-11-02T13:40:58+5:302017-11-02T13:41:25+5:30
बिबी : येथील ग्रामीण रुग्णालयात विविध औषधी व मेडिकल साधनांचा तुटवडा असल्यामुळे परिसरातील गरीब रुग्णांना आर्थिक झळ सहन करावी लागत आहे.
बिबी : येथील ग्रामीण रुग्णालयात विविध औषधी व मेडिकल साधनांचा तुटवडा असल्यामुळे परिसरातील गरीब रुग्णांना आर्थिक झळ सहन करावी लागत आहे.
बिबी येथे शासनाचे ग्रामीण रुग्णालय आहे कि जेथे बिबी आणि आसपासच्या खेड्यांतील गरीब रुग्ण दररोज उपचारासाठी येतात. बºयाचवेळा रुग्णांना सलाईन अथवा धर्नु$वाताच्या इंजेक्शनची गरज भासते. परंतु ही औषधी वारंवार येथे उपलब्ध नसल्याचे रुग्णांना सांगण्यात येते. त्यांना सिरींज, आय.व्ही.सेट (सलाईन) बाहेरून आणण्याचे सांगितले जाते. बºयाचदा रुग्णांना गरीब असल्यामुळे सदरील सामुग्री विकत न आणू शकल्यामुळे विनाउपचार परत जावे लागते व दुखणे अंगावर सोसावे लागते. त्याचप्रमाणे रुग्णालयात स्थायी स्वरुपाची नियुक्ती असणाºया परिचारकांचा सुद्धा तुटवडा आहे. सदरील रुग्णालयात कंत्राटी पद्धतीने काम करणाºयाच परिचारिका काम करताना दिसतात. या अशा गैरसोयींमुळे परिसरातील गरीबांचे आरोग्य धोक्यात आल्याचे दिसते. याकडे संबंधित लक्ष देतील काय? येथील औषध निर्माता डी.आर.चव्हाण यांना विचारपूस केली असता त्यांनी सदरील औषधी येथे उपलब्ध नसल्याचे संकते दिले. दरम्यान, वरिष्ठस्तरावरूनच औषधी उपलब्ध होत नसल्याचीही माहिती प्राप्त झाली आहे.