लोकमत न्यूज नेटवर्कमेहकर : प्रवाशांनी भरलेल्या काळीपिवळीच्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने, काळीपिवळीने समोरुन येणार्या एसटी बसला जोरदार धडक दिली. या अपघातात १७ प्रवाशी जखमी झाले आहेत. यामध्ये काळीपिवळीतील ११ तर एसटीतील ६ प्रवाशांचा समावेश आहे.काळीपिवळीचा चालक गंभीर असल्यामुळे त्याला औरंगाबाद येथे हलविण्यात आले आहे. मेहकर-चिखली मार्गावर बाभुळखेड फाट्याजवळ २३ जून रोजी सकाळी १0.३0 वाजताच्या सुमारास हा अपघात घडला. मेहकर-चिखली मार्गावर काळीपिवळी या प्रवाशी वाहतूक करणार्या वाहनात नेहमीच चढाओढ असते. प्रवाशी मिळविण्याच्या नादात चालक वेगाच्या सर्व र्मयादा ओलांडतात. सकाळी प्रवाशांनी खचाखच भरलेली काळीपिवळी क्र. एम.एच. २८ -७९५ ही चिखलीवरुन मेहकरकडे येत असतांना, काळीपिवळीच्या चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने काळीपिवळी समोरुन येणार्या एसटी बस क्र. एम.एच.४0 - ९९४७ वर जोरदार धडकली. या अपघातात काळीपिवळीचा समोरील भाग चकनाचूर झाला आहे. काळीपिवळीतील चालकासह समोर बसलेले प्रवाशी गंभीर जखमी झाले. काळीपिवळी मधील राजु लाकडे, सुनिल लाकडे (३१), वंदना सुनिल लाकडे (२७), अश्विनी सुनिल लाकडे (0४), अर्चना राजु लाकडे (४५) सर्व रा.गजरखेड, सज्रेराव गवई (४५) रा.चंदनपूर, रामप्रसाद मुंडकुळे (६0) पिंपळगाव उंडा, भागवत मुंडकुळे, रुख्मीना दामोधर मुंडकुळे (७0) दोघे रा.पिंपळगाव उंडा हे जखमी झाले आहेत. काळीपिवळी चालक किशोर प्रल्हाद सोनटक्के (३२) रा.मेहकर व धमेंद्र मधुकर नवले (२५) गजरखेड हे दोघे गंभीर जखमी झाल्यामुळे त्यांना औरंगाबाद येथे हलविण्यात आले आहे. एसटी बसमधील गणेश बा. जाधव देऊळघाट, संभाजी मरीबा कांबळे (६५) रा.मालेगाव, माधुरी राजधर सुरडकर (३0) एस.टी.वाहक रा.बुलडाणा, गणेश संपत इंगळे (४0) रा.हिवराआश्रम, हिराबाई बाबुराव देशमुख (८0) रा.देऊळघाट, अरुणा बाबुराव देशमुख (५५) रा.माळविहिर ता.बुलडाणा हे जखमी झाले आहेत. काही जखमींना स्थानिक ग्रामीण रुग्णालयात उपचारानंतर खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
काळी-पिवळी व एसटीची धडक; १७ जखमी
By admin | Published: June 24, 2017 5:33 AM