बेपत्ता पोलीस कर्मचार्याचा मृतदेह आढळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2017 01:15 AM2017-08-09T01:15:36+5:302017-08-09T01:16:41+5:30
बुलडाणा : गेल्या २९ जुलैपासून बेपत्ता असलेले पोलीस कर्मचारी रमेश प्रभाकर धारकरी यांचा मृतदेह मिळाल्याने खळबळ उडाली आहे. येथील मुकुल वासनिक विधी कॉलेजच्या मागे असलेल्या एका नाल्यात धारकरी यांचा मृतदेह आढळून आला. मृतदेहाची अवस्था इतकी वाईट होती की, पोष्ट मार्टेमसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयातही आणणे शक्य नव्हते. मृतदेह पूर्णत: कुजलेला असल्याने जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉ.राठोड यांनी घटनास्थळावर जाऊन शवविच्छेदन केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : गेल्या २९ जुलैपासून बेपत्ता असलेले पोलीस कर्मचारी रमेश प्रभाकर धारकरी यांचा मृतदेह मिळाल्याने खळबळ उडाली आहे.
येथील मुकुल वासनिक विधी कॉलेजच्या मागे असलेल्या एका नाल्यात धारकरी यांचा मृतदेह आढळून आला. मृतदेहाची अवस्था इतकी वाईट होती की, पोष्ट मार्टेमसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयातही आणणे शक्य नव्हते. मृतदेह पूर्णत: कुजलेला असल्याने जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉ.राठोड यांनी घटनास्थळावर जाऊन शवविच्छेदन केले. रमेश प्रभाकर धारकरी येथील चिखली रोड परिसरातील रहिवाशी असून ते दे.राजा पोलिस स्टेशनला कार्यरत होते. २९ जुलैच्या रात्री २.३0 च्या दरम्यान ते आपल्या राहत्या घरुन निघून गेले होते. याबाबत त्यांचे भाऊ सुरेश प्रभाकर धारकरी यांनी बुलडाणा शहर पोलिस स्टेशनला फिर्यादही नोंदवली होती. पोलिस त्यांचा शोध घेत होते. धारकरी यांचा मृत्यू कशामुळे झाला त्यांनी आत्महत्या केली की काही दुसरे कारण आहे? याची माहिती मिळू शकली नाही. घटनास्थळावरच धारकरी यांच्या मृतदेहाचे शव विच्छेदन करण्यात आले.