बुलडाणा: बोगस बियाण्यामुळे दरवर्षी शेतकºयांना बसणारा आर्थिक फटका पाहता, कृषी विभागाने जिल्ह्यातील सुमारे १ हजार १५० कृषी केंद्राच्या तपासणीची मोहीम हाती घेतली आहे. आठवडाभरात यापैकी २०० कृषी केंद्राची तपासणी करून ५१ बियाणे आणि खतांचे नमुने अनुक्रमे नागपूर व औरंगाबाद येथे पाठविण्यात आले आहेत. येत्या कालावधीत याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्याच्या आधारावर पुढील कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली.खरीप पेरणीचे जिल्ह्यात ७ लाख ३८ हजार ५४१ हेक्टर नियोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये प्रमुख्याने सोयाबीन ४ लाख ६ हजार ३०० हेक्टर क्षेत्रावर व कापुस १ लाख ७४ हजार २५० हेक्टर क्षेत्रावर नियोजन आहे. पेरणीसाठी १ लाख ३९ हजार ४० क्विंटल बियाण्याची मागणी करण्यात आली आहे. पेरणी केल्यानंतर बियाणे न उगवणे, झाडांना फळधारणा न होणे, कपाशीवर बोंडअळीसारखे संकट येणे हा दरवर्षीचा अनुभव पाहता कृषी विभागाने गत आठवडाभरापासून जिल्ह्यात तपासणी मोहीम हाती घेतली आहे. खरीप हंगामासाठी लागणाºया खत बियाण्यांची गुणवत्ता तपासण्यासाठी प्रत्येक तालुकास्तरावर एक आणि जिल्हास्तरावरील एक असे एकूण १४ दक्षता पथक जिल्ह्यात कार्यन्वीत करण्यात आले आहेत. या दक्षता पथकांकडून मागील आठवड्यापासून जिल्ह्यातील कषी केंद्राची प्रत्यक्ष तपासणी सुरू झाली आहे. कृषी केंद्राच्या तपासणीमध्ये खत व बियाण्यांचे नमुने घेऊन ते पुढील तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात येतात. त्याचबरोबर कृषी केंद्राचे रेकॉर्ड, परवाना, बियाण्यांचे स्त्रोत, कागदपत्र तपासणी करण्यात येऊन संशयास्पद बाबी आढळल्यास संबंधीतांना थेट विक्री बंदचे आदेश दिले जातात. गेल्या आठवडाभरामध्ये २०० च्यावर कृषी केंद्राची तपासणी करण्यात आली असून सध्या या तपासणीला वेग आला आहे. यामध्ये एकूण ५१ खत, बियाण्यांचे नमुने घेण्यात आले आहेत. हे नुमने नागपूर व औरंगाबाद येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. यापुढेही कृषी निविष्ठांचे नमुने घेऊन ते तपासणीसाठी पाठविण्यात येणार असल्याचे सुत्रांनी सांगितले. सोयाबीनच्या आठ नमुन्यांचा समावेशकृषी विभागाच्या दक्षता पथकाने कृषी केंद्रावरून घेतलेल्या खत, बियाण्यांच्या नमुन्यामध्ये सोयाबीनच्या आठ नमुन्यांचा समावेश आहे. सोयाबीनचे हे नमुने नागपूर येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. तर खताचे ४३ नमुने औरंगाबाद येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली.
१४ पथकात ६९ अधिकारीकृषी निविष्ठांच्या प्रभावी गुणनियंत्रणासाठी कार्यन्वीत करण्यात आलेल्या जिल्हा स्तरीय दक्षता पथक व तालुकास्तरीय दक्षता पथक अशा एकूण १४ पथकामध्ये ६९ अधिकाºयांचा समावेश आहे. जिल्हा स्तरीय दक्षता पथकामध्ये कृषी विकास अधिकारी, जिल्हा गुणनियंत्रण निरिक्षक, सहाय्यक नियंत्रक वैद्य मापन शास्त्र, मोहीम अधिकारी जिल्हा परिषद अशा एकूण चार अधिकाºयांचा यामध्ये समावेश आहे. तर तालुकास्तरीय पथकामध्ये तालुका कृषी अधिकारी, पंचायत समिती कृषी अधिकारी, वजन मापे निरिक्षक, मंडळ कृषी अधिकारी, कृषी अधिकारी तालुका कृषी अधिकारी कार्यालय अशा एकूण पाच अधिकाºयांचा समावेश आहे.