- सुहास वाघमारे लोकमत न्यूज नेटवर्कनांदुरा: आजारी बहिणीच्या मृत्यूनंतर भावाने रेल्वेखाली आत्महत्या केल्याची घटना ३१ मे रोजी घडली. या घटनेने समाजमन हेलावले आहे.नांदुरा शहरातील रेल्वे स्टेशन परिसराजवळील संत गजानन महाराज मंदिराजवळ सामाजिक जीवनापासून कोसो दूर वयोवृद्ध देशमुख बहिण-भाऊ झोपडीत राहत होते. त्यांचे एकाकी जीवन परिसरातील इतरांसाठी नेहमीच कुतुहलाचा विषय ठरत होता. कुणी त्यांना मदत केल्यास ते स्वाभिमानी स्वभावाचे असल्याने नाकारत असत. त्यापैकी धनुर्धर जगन्नाथ देशमुख (वय ५६) या भावाचा ३१ मे रोजी रेल्वेखाली कटून मृत्यू झाला. याबाबतची माहिती त्याचा झोपडीतील वयोवृद्ध बहिणीला देण्याकरिता परिचितांनी त्यांची झोपडी गाठली, तर त्यांना त्यांची बहिण शशिकला जगन्नाथ देशमुख (वय ६३) हिचा जमिनीवर पडलेला मृतदेह दिसून आला. आजारी बहिणीच्या मृत्यूने हेलावलेल्या भावाने आपली जीवनयात्रा संपवण्याचे वास्तव जगासमोर आले. बहिणीचा झोपडीत तर भावाचा रेल्वे पटरीवर मृतदेह पडून होता.त्यांच्या मृत्यूची माहिती त्यांची आजारी बहीण शशिकला हिला द्यावी, याकरिता एका परिचित व्यक्तीने त्यांची झोपडी गाठली. त्यावेळी त्याला मृतकाची बहिण शशिकला जगन्नाथ देशमुख (वय ६३) हिचा जमिनीवर पडलेला मृतदेह दिसून आला.मृतदेहाची पाहणी केली असता तिचा मृत्यू सुमारे दोन दिवसांपूर्वीच झाला असल्याचे व तिच्या मृत्यूने एकाकी पडलेल्या भावानेही रेल्वेखाली आत्महत्या केल्याचे वास्तव समोर आले. हे दोन्ही मृतक भाऊ-बहीण परिसरात कोणालाही परिचय न देत व एकाकी जीवन जगण्याचा त्यांचा स्वभाव असल्याचे परिसरातील नागरिक सांगत होते. याबाबतची माहिती परिसरातील काही नागरिकांनी समाजसेवी संस्था ओमसाई फाउंडेशनला दिली . त्यांना कोणीही आप्तेष्ट, मित्र किंवा नातेवाईक नसल्याने त्या मृतक भाऊ- बहिणींवर अंत्यसंस्कार करण्याकरीता ओमसाई फाउंडेशनने पुढाकार घेतला.ओमसाई फाउंडेशनचे विलास निंबोळकर , प्रेमचंद जैन, सचिन जैन, कमलेश बोके, विक्की नामगे, प्रवीण डवंगे यांनी अंत्यसंस्कारांसाठी परिश्रम घेतले. नगरसेवक प्रमोद गायकवाड व अजय भिडे, सामाजिक कार्यकर्ते विनल मिरगे, रेल्वे कर्मचारी आकाश गायकवाड, पोहेकॉ गजानन सातव , अनिल इंगळे यांनी सहकार्य केले. अविवाहित राहून एकाकी जीवन जगणाऱ्या भाऊ व बहिणीचे हे कुटुंब परिसरातील इतरांचे नेहमीच लक्ष वेधुन घेत होते. त्यांचे दु:ख जाणून घेऊन त्यांना मदत करावी, याकरिता अनेकांनी प्रयत्न केले.
आजारी बहिणीच्या मृत्यूनंतर भावाची रेल्वेखाली आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2019 3:47 PM