बुलडाणा : बुलडाणा - बोथा - खामगाव मार्ग ३० जानेवारी ते २८ फेब्रूवारी दरम्यान ३० दिवस बंद राहणार आहे. विदर्भाची वनपंढरी म्हणून ओळख असलेल्या ज्ञानगंगा अभयारण्यातून जाणाºया रस्त्याच्या नुतनीकरण व मजबुतीकरणाच्या कामाला मान्यता मिळाली आहे. सध्या जंगलातील रस्त्याचे काम करायचे असल्याने आणि वाहनांना खाली उतरवुन वन विभागाच्या हद्दीतुन जाण्यास परवानगी नसल्याने हा रस्ता बंद करण्यात येत आहे. कंत्राटदाराने यासाठी ३० दिवसांचे नियोजन केले असून ३० जानेवारी ते २८ फेब्रूवारी दरम्यान बुलडाणा- बोथा- खामगाव मार्ग बंद करून हा मार्ग बुलडाणा- वरवंड- उंद्री- खामगाव या पर्यायी मार्गाने वळविण्यात आल्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी निर्गमित केले आहे. खामगाव - बोथा - बुलडाणा या मार्गावर रात्री १० ते सकाळी ५ या वेळात कायम वाहतूक बंद होती. आता २८ फेब्रुवारीनंतर सुध्दा रात्री हा मार्ग बंदच राहणार आहे. त्यासंबधीचा आदेश जुलै २०५ मध्येच झालेला आहे. पुढील एक महिना बुलडाणा ते खामगाव रस्त्यावरील वाहतूक बंद करुन बुलडाणा-वरवंड-उंद्री-खामगांव या पर्यायी मार्गाने वाहतूक वळविण्यात येत आहे.
बुलडाणा - बोथा - खामगाव मार्ग २८ फेब्रूवारीपर्यंत बंद राहणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2021 3:47 PM
Buldhana - Khamgaon Road News बुलडाणा - बोथा - खामगाव मार्ग ३० जानेवारी ते २८ फेब्रूवारी दरम्यान ३० दिवस बंद राहणार आहे.
ठळक मुद्देरस्त्याच्या नुतनीकरण व मजबुतीकरणाच्या कामाला मान्यता मिळाली आहे. हा मार्ग बुलडाणा- वरवंड- उंद्री- खामगाव या पर्यायी मार्गाने वळविण्यात येत आहे.