बुलडाणा: जिल्ह्यातील सहा तालुक्यात कोरोना संसर्गाने बाधीत झालेल्या रुग्णांची संख्या १७ वर पोहोचली आहे. दरमान, या सात तालुक्यातील संबंधित हायरिस्क झोनमधील ४८ हजार ६६७ नागरिकांची आरोग्य विभागाच्या पथकाद्वारे तपासणी करण्यात आली आहे.बुलडाणा जिल्ह्यात बुलडाणा येथे पाच (एकाचा मृत्यू झालेला आहे), चिखली येथे तीन, देऊळगाव राजा येथे दोन, सिंदखेड राजा येथे एक, खामगावातील चितोडा गावात दोन आणि शेगाव येथे तीन व्यक्ती तर मलकापूर येथे एक पॉझीटीव्ह आढळून आलेल्या आहेत. या व्यक्ती ज्या भागात राहतात त्या भागातील ९ हजार ५४४ घरांची सध्या तपासणी सुरू असून त्यासाठी १९८ पथके कार्यरत असून ३५ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम स्थानिक पातळीवर सुरू आहे. दरम्यान, मलकापूरमधीलही एक रुग्ण आढळून आल्याने तेथेही खळबळ उडाली.
२३१ जणांना खोकला व तापबुलडाणा जिल्ह्यात १७ कोरोना संसर्गाचे रुग्ण आढळल्याच्या पार्श्वभूमीवर सात हायरिस्क झोनमध्ये आरोग्य विभागाने केलेल्या तपासणीदरम्यान २३१ व्यक्तींना सर्दी, खोकला व तापा असल्याचे समोर आले आहे. १९८ पथकाद्वारे हा हायरिस्क झोनमधील नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. दरम्यान, मलकापूर येथेही एक रुग्ण पॉझीटीव्ह आढळल्यामुळे जिल्ह्यातील १३ पैकी सात तालुक्यात कोरोना संसर्ग पोहोचला आहे.