लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: गतवर्षी आसमानी संकटाने सोयाबीनला फटका बसल्यानंतर यंदा बोगस सोयाबीन बियाण्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडल्यामुळे आक्रमक झालेल्या शेतकºयानी २९ जुलै रोजी थेट कृषी अधीक्षक अधिकारी कार्यालयात ठिय्या मांडला असून जो पर्यंत दोषी कंपनीवर गुन्हे दाखल होत नाही तो पर्यंत कार्यालय न सोडण्याचा इशारा दिला आहे. दुपारी एक वाजल्यापासून सुरू झालेला हा ठिय्या रात्री नऊ वाजले तरी सुरू होता.जिल्ह्यात तब्बल ५२७ शेतकºयांचे ६१७ हेक्टरवरील सोयाबीनच उगवले नाही. त्यामुळे आक्रमक झालेल्या औरंगाबाद येथील एका कंपनीविरोधात प्रकरणी कारवाई करून शेतकºयांना नुकसान भरपाई २९ जून रोजीच द्यावी, अशी जोरकस मागणी या शेतकºयांनी लावून धरली होती. त्यामुळे २९ जून रोजी दिवसभर कृषी अधीक्षक कार्यालयात चांगलीच धावपळ सुरू होती.दरम्यान, शेतकºयांना प्रती हेक्टरी बियाणे व मजुरी, खताचा वाया गेलेला खर्च पाहता किमान दहा हजार रुपये नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकºयांनी लावून धरली आहे. जोपर्यंत याबाबत निर्णय होत नाही, तोपर्यंत कृषी अधीक्षक अधिकारी कार्यालयातील ठिय्या आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा शेतकºयांनी दिला आहे. प्रसंगी शासनाने त्वरित निर्णय न घेतल्यास संबंधीत कंपनीचे गोडावूनच जाळून टाकण्याचा इशारा देण्यात आला आहे.राज्यात मोठ्या प्रमाणावर बियाणे कंपन्यांनी व महाबीजने विक्री केलेले बियाणे उगवलेच नसल्याच्या शेतकºयांच्या तक्रारी आहेत. यासंदर्भात बुलडाणा जिल्ह्यातील शेतकºयांनी चिखली येथील एका कंपनीच्या कार्यालयासमोर आंदोलन केले होते. त्यात शेतकºयांना न्याय मिळण्याच्या ऐवजी त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न झाला होता, असा रविकांत तुपकर यांनी केला आहे. दरम्यान शेतकºयांना नुकसान भरपाई देण्याची तयारी या कंपनीने दाखवली होती. मात्र आठ दिवसानंतरही त्यादृष्टीने पावले उचलल्या गेली नाहीत. परिणामी संतप्त झालेल्या शेतकºयांनी थेट कृषी अधीक्षक अधिकारी कार्यालय गाठून तेथेच ठिय्या आंदोलन सुरू केले. शेतकºयांनी स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी कार्यालयात २९ जून रोजी दुपारी ठिय्या मांडला, तो रात्री नऊ वाजेपर्यंतही सुरू होता.सोयाबीन पीकाची पेरणी करूनही उगवत नसल्याने शेतकºयांवर दुबार पेरणीचे संकट कोसळले आहे. तातडीने आर्थीक मदत किंवा दर्जेदार बियाणे देण्याची मागणी जिल्हाभरातील शेतकरी करीत आहेत.कंपन्यांविरोधात गुन्हे दाखल कराकथितस्तरावर निकृष्ट बियाणे देणाºया कंपन्यांकडून शेतकºयांना बियाण्याच्या रकमेसह, खत, मजुरीचा खर्च अशी नुकसान भरपाई द्यावी, सोबतच संबंधित कंपन्याविरोधात त्वरित गुन्हे दाखल करावे, अशी मागणी करत प्रसंगी कंपनीचे गोडावूनच जाळण्याचा इशारा शेतकºयांनी यावेळी दिला.
बुलडाणा: शेतकऱ्यांचा कृषी कार्यालयात आठ तास ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2020 11:30 AM