जिल्ह्यातील ५०९ गुन्हेगारांच्या शोधात बुलडाणा पोलीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:51 AM2021-01-08T05:51:53+5:302021-01-08T05:51:53+5:30
बुलडाणा : खून, दरोडा तथा सराईत असलेल्या ५०९ गुन्हेगारांच्या मागावर बुलडाणा पोलीस असून, आतापर्यंत ११ गुन्हेगारांचा शोध लावण्यात पोलिसांना ...
बुलडाणा : खून, दरोडा तथा सराईत असलेल्या ५०९ गुन्हेगारांच्या मागावर बुलडाणा पोलीस असून, आतापर्यंत ११ गुन्हेगारांचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले आहे.
दरम्यान अद्यापही गंभीर गुन्ह्यातील २० जण फरार असून, स्थानिक गुन्हे शाखा त्यांचा शोध घेत आहे. जिल्ह्यात गेल्या वर्षात घरफोडीच्या घटनांमध्ये ११ टक्क्यांनी वाढ झाली होती. त्यातील ७५ टक्के आरोपींचा अद्याप शोध घेतल्या गेलेला नाही. त्यामुळे या चोरीच्या गुन्ह्यांचा शोध घेऊन आरोपींना जेरबंद करण्याचे मोठे आव्हान पोलीस प्रशासनासमोर आहे. यासोबतच संपलेल्या वर्षात जिल्ह्यात नोव्हेंबर अखेरपर्यंत ४५ खुनाच्या घटना घडल्या होत्या. त्यातील ४२ प्रकरणात पोलिसांनी आरोपींना जेरबंद केले असले तरी तीन प्रकरणातील आरोपींचा शोध अद्याप घेतला गेलेला नाही. कोरोना संसर्गामुळे २०२० या वर्षात जिल्ह्यात आपसी वादाच्या घटनांमध्ये वाढ झाल्यामुळे जिल्ह्याचा क्राइम रेषोही वाढल्याचे एकंदरीत चित्र आहे. महिलांवरील अत्याचाराच्या घटनांतही वाढ झाली.
तडीपारीचे प्रस्ताव एसडीअेांकडे
गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या काहींचे तडीपारीचे प्रस्ताव सध्या जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाने उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडे पाठवलेले आहेत. त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही.
अवैध शस्त्रास्त्र विक्री रोखण्याचे आव्हान
गेल्यावर्षी नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात पोलिसांनी धडक कारवाई करून आठ पिस्तूल, आठ तलवारी व १५ जिवंत काडतुस जप्त केले होते. यासोबतच एटीएसने साखरखेर्डा येथे पार्सलमधून आलेले गावठी पिस्तूल जप्त केले होते. त्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली होती. या प्रकरणातील मूळ सूत्रधार अद्यापही फरार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहे. संपूर्ण वर्षात हे प्रकरण चांगलेच चर्चेत राहिले होते.
स्थानिक गुन्हे शाखेचे पथक कार्यरत
जिल्ह्यातील गुन्ह्यात पोलीस दलाला ५०९ आरोपी हवे आहेत. यातील काही आरोपी हे दोन ते तीन वर्षापासून फरार आहेत. त्यानुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक गठित करण्यात आले असून, गोपनिय माहितीच्या आधारावर हे पथक अशा आरोपींचा शोध घेत असल्याची माहिती पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘लोकमत’शी बोलताना दिली.
स्थानिक गुन्हे शाखेचे पथक कार्यरत
जिल्ह्यातील गुन्ह्यात पोलीस दलाला ५०९ आरोपी हवे आहेत. यातील काही आरोपी हे दोन ते तीन वर्षांपासून फरार आहेत. त्यानुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक गठित करण्यात आले असून, गोपनिय माहितीच्या आधारावर हे पथक अशा आरोपींचा शोध घेत असल्याची माहिती पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘लोकमत’शी बोलताना दिली.