लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: शहरासह तालुक्यात आठ जुलै रोजी सायंकाळी झालेल्या संततधार पावसामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयातील प्रसुतीगृह आणि जनरल वॉर्डमध्ये पाणी शिरल्याने रुग्णांचे हाल झाले. सर्वत्र पाणीच पाणी झाल्याने रुग्णांसोबतच त्यांच्या सोबत आलेल्या नातेवाईकांना मोठा त्रास सहन करावा लागला.बुलडाणा शहरात गेल्या काही दिवसानंतर प्रथमच जोरदार पाऊस झाला. सायंकाळी सहा वाजल्यापासून बुलडाणा शहरात जोरदार पावसास सुरूवात झाली. वादळी वाऱ्यासह हा पाऊस आल्यामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयातील प्रसुती गृह आणि जनरल वॉर्डमध्ये पावसाचे पाणी शिरले. त्यामुळे रुग्णांचे बेड तथा त्यांच्या सोबत आलेल्या नातेवाईकांची झोपण्याची मोठी अडचण झाली. अनेक रुग्णांच्या नातेवाईकांना रात्र जागून काढावी लागली. त्यामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयात पावसाचे पाणी शिरणार नाही, या दृष्टीने उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाल आहे. यासोबतच जिल्हा सामान्य रुग्णालयात काही ठिकाणी छतावरूनही पाणी टपकते. त्याचाही रुग्णांना त्रास होत असल्याची ओरड आहे.जिल्हा सामान्य रुग्णालयात यापूर्वी वराहांचाही सुळसुळाट झाला होता. अगदी प्रसुतीगृहा लगतही वराहांचा मुक्त संचार होता. मधल्या काळात वराह पकण्याची मोहिमही पालिकेने राबवली होती. त्यानंतर आता हे पावसाचे पाणी काही वार्डात घुसण्याचे प्रकरण समोर आले.दरम्यान, प्रसुतीगृहात पाणी घुसल्याच्या पार्श्वभूमीवर प्रसुतीगृह जुन्या जागेत हलविण्यात येत असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडीत यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. नव्या व जुन्या इमारतीमधील जोड दिलेल्या भागात पाण्याची गळती होत आहे. त्यातूनच हा प्रकार घडला आहे. ही गळती थांबविण्याचा आम्ही गत वर्षीही प्रयत्न केला होता. मात्र ही गळती थांबत नाही, असे ते म्हणाले.
बुलडाणा मंडळात अतिवृष्टीबुधवारी सायंकाळी सात ते रात्री ११ वाजेपर्यंत बुलडाणा शहरासह परिसरात अतिवृष्टी झाली. गुरूवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या २४ तासात एकट्या बुलडाणा मंडळात ८१ मिमी पावसाची नोंद झाली. जोरदार वाºयासह हा पाऊस पडल्याने जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या खिडक्यामधून मोठ्या प्रमाणावर पावसाचे पाणी प्रसुतीगृह, सामान्य वार्डात घुसले व त्यातून येथे रुग्णांची गैरसोय झाल्याचे सांगण्यात येत आहे.