बुलडाणा : अंढेरा येथे तलाठ्यांची अनुपस्थिती, ग्रामस्थांची कामे खोळंबली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2017 02:49 PM2017-12-15T14:49:58+5:302017-12-15T14:50:51+5:30
अंढेरा : देऊळगाव राजा तालुक्यातील अंढेरा येथील भाग एक आणि भाग दोनचे तलाठी अनुक्रमे डी. एस. खंदारे आणि तायडे हे गेल्या कित्येक दिवसापासून गैरहजर असल्याने ग्रामस्थांची कामे खोळंबली आहे.
अंढेरा : देऊळगाव राजा तालुक्यातील अंढेरा येथील भाग एक आणि भाग दोनचे तलाठी अनुक्रमे डी. एस. खंदारे आणि तायडे हे गेल्या कित्येक दिवसापासून गैरहजर असल्याने ग्रामस्थांची कामे खोळंबली आहे.
महसूल प्रशासनाचा महत्त्वाचा दुवा म्हणून तलाठी कार्यरत असतात. मात्र येथे हे तलाठी हजर नसल्याने ७/१२, आठ अ, उत्पन्नाचा दाखला, फेरफार, कर्जाचा बोजा चढवणे, उतरवणे अशी अनेक कामे सध्या खोळंबली आहे. खंदारे यांच्याकडे शेतकरी फेरफार नोंदी, खरेदी व्यवहार नोंदी यासाठी चकरा मारत आहेत. गावातील राजू विभूते यांच्या आईच्या नावावलील ७/१२ वर बोजा चढविण्यासाठी ते सातत्याने दोन महिन्यापासून चकरा मारत आहेत. परंतू अद्याप हे कामही झालेले नाही. भाग एक मधील बहुतांश कामे कोतवाल करीत असल्याने तलाठी येथे दहा दहा दिवस चकरा मारत नाही. याबाबत भाग एकचे तलाठी यांना संपर्क साधला असता त्यांचा भ्रमणध्वनी बंद होता. भाग दोनचे तलाठी यांना संपर्क साधला असता त्यांनी अयोग्य भाषेत उत्तर दिले. दरम्या, १४ डिसेंबर रोजी तलाठी कार्यालय दिवसभर बंद होते. हे कार्यालय बंद असल्याचे माजी सरपंच रविंद्र सानप, राजू विभूते, समाधान सानप, कैलास नागरे, कैलास लोखंडे, मदन बनसोडे, जगदीश सानप यांच्याही निदर्शनास आले.
यातील एका तलाठ्यास तीन महिन्यापूर्वीच निलंबीत करण्यात आले होते. आता या प्रकरणाचीही पुन्हा शहानिशा करून अनुषंगीक कार्यवाही करू.
-दीपक बाजड, तहसिलदार, देऊळगाव राजा.