बुलडाणा : व्यवसाय प्रशिक्षण योजनेच्या अर्जासाठी २४ नोव्हेंबरची डेडलाईन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 01:41 PM2017-11-20T13:41:02+5:302017-11-20T13:41:29+5:30

बुलडाणा : महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळची व्यवसाय प्रशिक्षण योजना जाहीर झाली आहे. त्यासाठी अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील पात्र उमेदवारांचे व्यावसायिक प्रशिक्षण निवडीकरीता अर्ज सादर करण्यासाठी २४ नोव्हेंबरची डेडलाईन देण्यात आली आहे.

Buldhana: Deadline for the application for business training scheme is 24th November | बुलडाणा : व्यवसाय प्रशिक्षण योजनेच्या अर्जासाठी २४ नोव्हेंबरची डेडलाईन

बुलडाणा : व्यवसाय प्रशिक्षण योजनेच्या अर्जासाठी २४ नोव्हेंबरची डेडलाईन

Next
ठळक मुद्देमहात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ


बुलडाणा : महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळची व्यवसाय प्रशिक्षण
योजना जाहीर झाली आहे. त्यासाठी अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील पात्र
उमेदवारांचे व्यावसायिक प्रशिक्षण निवडीकरीता अर्ज सादर करण्यासाठी २४
नोव्हेंबरची डेडलाईन देण्यात आली आहे.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातंर्गत महात्मा फुले मागासवर्ग विकास
महामंडळ यांच्या जिल्हा कार्यालयाला सन २०१७-१८ आर्थिक वर्षाकरीता
उद्दिष्ट प्राप्त झाले  आहे. सदर उद्दिष्ट व्यावसायिक प्रशिक्षण
योजनेतंर्गत देण्यात आले आहे. त्यानुसार अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील
पात्र उमेदवारांचे व्यावसायिक प्रशिक्षण निवडीकरीता अर्ज मागविण्यात आले
असून, २४ नोव्हेंबरपर्यंत जिल्हा कार्यालय, महात्मा फुले मागासवर्ग विकास
महामंडळ, सामाजिक न्याय भवन, येथे अर्ज स्विकारण्यात येणार आहेत.
अनुसूचित जाती व नवबौद्ध संवर्गातील पात्र उमेदवारांची निवड व्यवसाय
प्रशिक्षण योजनेतंर्गत करण्यात येणार आहे. या योजनेसाठी मात्र मातंग व
चर्मकार संवर्गातील सर्व जाती व त्यामध्ये येणारे सर्व उपजातीचे लाभार्थी
पात्र असणार नाही.  योजनेचा गरजू व इच्छूक सुशिक्षीत बेरोजगार युवकांनी
लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक संजय लातूरकर  यांनी केले आहे.

Web Title: Buldhana: Deadline for the application for business training scheme is 24th November

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.