बुलडाणा : शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करण्याच्या संदर्भाने विदर्भातील नागपूर, वर्धा आणि बुलडाणा जिल्हा बँकेच्या अधिकाऱ्यांच्या मुंबईतील बैठकीत बुलडाणा जिल्हा सहकारी बँकेस ५० कोटी रुपये यासाठी विनातारण देण्याची मागणी समोर आली होती. मुख्यमंत्र्यांनी त्यासंदर्भाने सहमतीही दर्शवली होती. मात्र अद्याप ही रक्कम जिल्हा बँकेस मिळालेली नाही.प्रकरणी कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी आपण व्यक्तीश: यासाठी पाठपुरावा करत असल्याचे सुतोवाच डीपीसीच्या बैठकीत केले होते. त्यामुळे मुळातच तांत्रिक अडचणींमुळे पीक कर्ज वाटपाचा टक्का घसरलेला असताना ही ५० कोटींची रक्कम जिल्हा बँकेला मिळाल्यास जवळापस जिल्ह्यातील दहा हजार शेतकºयांना जिल्हा बँक पीक कर्ज वाटप करू शकते.वास्तविक जिल्हा सहकारी बँकेला यंदा ५० कोटी रुपयांचे पीक कर्ज दहा हजार शेतकºयांना वाटपाचे उदिष्ट वार्षिक पतआराखड्यातंर्गत देण्यात आलेले आहे. त्यापैकी बँकेने आतापर्यंत चार हजार ८०९ शेतकºयांना २३ कोटी १४ लाख ४३ हजार रुपयांचे पीक कर्ज वाटप केले आहे. दरम्यान जिल्हा बँकेस राज्य सहकारी बँकेकडून आणखी ५० कोटी रुपये मिळाल्यास जिल्हा बँक ही गतवर्षी पीक कर्ज देलेल्या शेतकºयांच्या पीक कर्जचो पूनर्गठन करून त्यांना २० टक्क्यांनी वाढीव कर्ज देऊ शकते. सोबतच नवीन शेतकºयांनाही पीक कर्ज देण्याची तजबीज जिल्हा बँक करू शकते. त्यादृष्टीने आता प्रभावी हालचाल होण्याची गरज आहे. त्यानुषंगाने पालकमंत्र्यांकडे आता शेतकºयांच्या नजरा लागल्या आहेत.
बुलडाणा जिल्हा बँकेला राज्य सहकारी बँकेकडून हवेत ५० कोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2019 3:19 PM