संग्रामपूर : बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्याच्या सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी आलेवाडी बृहत लघू पाटबंधारे प्रकल्प होत असून या प्रकल्पाला सुरूवातीपासूनच स्थानिक आदिवासी बांधवाचा या प्रकल्पाला तीव्र विरोध होत आहे. यामुळे जिल्हा प्रशासनासमोर पेच निर्माण झाला आहे. हा प्रकल्प या परिसरात झाल्यास या प्रकल्पात हजारो आदिवासी बांधवांच्या संत्राच्या बागा नष्ट होवून हा प्रकल्प येथे होणार आहे. तसेच हा प्रकल्प येथे झाल्यास आदिवासी बांधवांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्नही येथे उपस्थित होणार असून या प्रकल्पामुळे ९५ टक्के आदिवासी बांधव भुमिहीन होणार असल्यामुळे या प्रकल्पाचा आदिवासी बांधवांचा तीव्र विरोध होत असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा प्रकल्प नामंजुर करावा, अशी अपेक्षा आदिवासी बांधवांकडून होत आहे. ज्याठिकाणी हा आलेवाडी सिंचन प्रकल्प उभारण्यात येत आहे. त्याठिकाणी आज सुमारे दीड लाख पेक्षाही जास्त प्रमाणात संत्र्याची फळबाग आहे. तसेच याच परिसरात ९५ टक्के आदिवासी बांधव वास्तव्यास आहेत. तसेच संग्रामपूर तालुक्यामधील सर्वात जास्त सुपीकच बागायत शेत जमीन ही याच परिसरात असल्यामुळे याठिकाणी हा प्रकल्प उभारण्यात आल्यास ९५ टक्के आदिवासी बांधव भुमिहीन होणार आहेत. त्यामुळे सुरूवातीपासूनच या प्रकल्पाला आदिवासी बांधवांचा तीव्र विरोध होत असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पाचे काम थांबवुन हजारो आदिवासी बांधवांना न्याय द्यावा व भूमिहीन होणाºया आदिवासी बांधवांना न्याय द्यावा, अशी अपेक्षा आलेवाडी सिंचन प्रकल्पात बाधित होणाºया आदिवासी बांधवांकडून व्यक्त होत आहे. आदिवासींना देशोधडीला लावणारा हा प्रकल्प असून आमची मौल्यवान बागायती जमीन हिरावून घेणारा हा प्रकल्प आहे. त्यामुळे हा प्रकल्प रद्द करावा, अशी आमची आदिवासी बांधवांची मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून अपेक्षा आहे. - सत्तार भिकन केदार, शेतकरी आलेवाडी
बुलडाणा जिल्हा : आलेवाडी सिंचन प्रकल्पातील शेतकरी न्यायाच्या प्रतिक्षेत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2017 3:27 PM
संग्रामपूर : बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्याच्या सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी आलेवाडी बृहत लघू पाटबंधारे प्रकल्प होत असून या प्रकल्पाला सुरूवातीपासूनच स्थानिक आदिवासी बांधवाचा या प्रकल्पाला तीव्र विरोध होत आहे.
ठळक मुद्दे या प्रकल्पाला सुरूवातीपासूनच स्थानिक आदिवासी बांधवाचा या प्रकल्पाला तीव्र विरोध होत आहे. या प्रकल्पामुळे ९५ टक्के आदिवासी बांधव भुमिहीन होणार असल्यामुळे विरोध.संग्रामपूर तालुक्यामधील सर्वात जास्त सुपीकच बागायत शेत जमीन ही याच परिसरात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा प्रकल्प नामंजुर करावा, अशी अपेक्षा आदिवासी बांधवांकडून होत आहे.