लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : यावर्षीच्या शैक्षणिक सत्रासाठी विद्यार्थ्यांना गणवेश मिळणार की नाही याबाबत शंका असतानाच समग्र शिक्षा अभियान कक्षाने बुलडाणा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी ८ कोटी ५० लाख ३४ हजार रूपये निधी मंजूर केला आहे. १३ नोव्हेंबर रोजीच्या पत्रानुसार आता विद्यार्थ्यांना गणवेश मिळणार हे निश्चीत झाले आहे.कोरोनाच्या महामारीमुळे यावर्षी पहिले सत्र संपूनही अजूनपर्यंत शाळा सुरू झाल्या नाहीत. नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग २३ नोव्हेंबर पासून सुरू करण्याच्या सूचना आहेत. दरम्यान, त्याचा अनुभव घेवून लवकरच आठवीच्या खालच्या इयत्तेचे वर्ग सुरू करण्याचे निर्देश दिले जावू शकतात.पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठीच्या गणवेशाचा निधी जुलै महिन्यात शाळा व्यवस्थापन समितीच्या खात्यावर टाकला जात होता. यंदा कोरोनामुळे निधी उपब्ध झाा नाही. मात्र आता जिल्ह्यातील १ लाख ४१ हजार ७३२ विद्यार्थ्यांसाठी ८ कोटी ५० लाख रूपयांच्या निधीची मागणी असून तो मिळाल्यानंतर गणवेश खरेदीचा मार्ग मोकळा होईल. यंदा मात्र एकच गणवेश उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
विद्यार्थ्यांना यावर्षीही मिळणार गणवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2020 3:50 PM