नांदुरा: तालुक्यातील रामपूर येथील एक शेतकरी शेतात जात असताना बैलजोडीसह वाहून गेला. ज्ञानगंगा नदीपात्रात ही घटना बुधवारी सकाळी १० वाजता घडली. दरम्यान, प्रसंगावधान राखून काही शेतकरी धाऊन आल्याने शेतकºयाचा जीव बचावला. मात्र, बैलजोडी या घटनेत मृत्यूमुखी पडली. नांदुरा तालुक्यात परतीच्या पावसाने शेतातील पिकांची नासाडी झाली आहे. दोन दिवसांपासून पाऊस बंद झाल्याने शेतातील पिकांची कापणी करण्याकरिता शेतकºयाची लगबग सुरू आहे . दरम्यान, बुधवारी सकाळी तालुक्यातील निमगाव जवळील रामपूर येथील विठ्ठल शेषराव बुले (२४) हा युवा शेतकरी बैलजोडीसह शेतात जात होता. नदीपात्रातील पाण्याचा अंदाज चुकल्याने व बैलजोडी उलटल्याने हा युवा शेतकरी बैलजोडीसह वाहून गेला . मात्र, वेळीच काही शेतकरी आणि प्रत्यक्षदर्शी घटनास्थळी धाऊन आले. काहींनी उडी घेत तर काहींनी दोराच्या साहाय्याने वाहून जाणारी बैलजोडी पुरातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे शेतकºयाला वाचविण्यात गावकºयांना यश आले. मात्र, या दुर्देवी घटनेत बैल जोडीचा मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच नायब तहसीलदार मारकड ,मंडळ अधिकारी जोशी ,तलाठी शिरसागर व ठाकरे तसेच कोतवाल प्रभाकर भिसे, गणेश कुवारे व पशुचिकित्सक यांनी नदीपात्र गाठून पंचनामा केला आहे .
नदीपात्रात बैलजोडीचा बुडून मृत्यू; शेतकरी बालंबाल बचावला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 06, 2019 6:56 PM