चिखली : गावंडे कॉलेज ऑफ फार्मसी, साखरखेर्डा येथे महाविद्यालयातील बी. फार्म. तृतीय व चतुर्थ शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी ‘व्यक्तिमत्त्व विकास व फार्मसी क्षेत्रातील विविध विभागांत रोजगाराच्या संधी’ या विषयावर मार्गदर्शनपर रोजगार सप्ताह साजरा करण्यात आला. या सप्ताहादरम्यान विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्त्व विकासासह रोजगार आणि पूर्वतयारी संदर्भाने तज्ज्ञ मार्गदर्शकांचे ऑनलाईन मार्गदर्शन लाभले. यामध्ये ट्रायका फार्मा, अहमदाबादचे प्रांजल वानखेडे, ब्लीस जीव्हीएस फार्मा, मुंबईचे डॉ. अमोलकुमार लोखंडे, ॲबट फार्मा, मुंबईचे अभिजित गुजर, रिलायन्स फार्मा, मुंबईचे रविकिरण पायघन आणि न्यू हॉरोझोनस हेल्थकेअर, मुंबईचे श्रेयस घाणेकर यांनी विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले. विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ मान्यवरांच्या मार्गदर्शनाचा विद्यार्थ्यांना भावी वाटचालीत निश्चित फायदा होणार आहे, असा विश्वास संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. नीलेश गावंडे यांनी व्यक्त केला. महाविद्यालयाच्या या उपक्रमाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. या उपक्रमासाठी प्राचार्य डॉ. प्रशांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. तौफीक शेख व प्रा. शत्रुघ्न नागरिक यांनी परिश्रम घेतले.
गावंडे कॉलेज ऑफ फार्मसीत रोजगार मार्गदर्शन सप्ताह साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2021 4:41 AM