काेराेनाचा उद्रेक
बुलडाणा : शहर व तालुक्यात गत काही दिवसांपासून काेराेना रुग्णांची संख्या वाढतच आहे. शुक्रवारी शहर व तालुक्यात काेराेनाचा उद्रेक हाेऊन ३३३ जणांचा अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. तसेच शेकापूर येथील ५८ वर्षीय पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
वृक्षसंवर्धनाकडे होतेय दुर्लक्ष!
देऊळगाव मही : सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने रस्त्यांच्या दुतर्फा वृक्षलागवड करण्यात आली आहे. मात्र या वृक्षरोपट्यांच्या संवर्धनाकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसून येत आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.
पाण्याच्या शोधात प्राण्यांची गावाकडे धाव
धामणगाव बढे : परिसरात अस्वलाचा मुक्तसंचार असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पहाटेच्या वेळी १३ मैल परिसरात अनेकदा अस्वल दिसतो. शेतकरी शेतात जात असताना त्यांच्यात भीतीचे वातावरण आहे.
सुरक्षित अंतर ठेवून वस्तूंची विक्री करा
किनगावराजा : किराणा दुकानदारांनी सुरक्षित अंतराची व्यवस्था करून वस्तूंची विक्री करावी, असे आवाहन करण्यात येत आहे. ग्राहकांसाठी हॅण्डवॉशची सुविधा उपलब्ध करून द्यावी, याबाबत मोताळा येथे जनजागृती करण्यात आली.
मेहकर तालुक्यात १० विहिरींचे अधिग्रहण
मेहकर : मागील वर्षी मेहकर तालुक्यात पावसाचे प्रमाण चांगले होते. यामुळे तालुक्यातील पेनटाकळी कोराडी प्रकल्पासह इतर लघू जलाशय तुडुंब भरले होते. मात्र तरीही मेहकर तालुक्यातील काही गावांमध्ये पाणीटंचाईचे सावट कायम असून, पाणीटंचाईकरिता आजपर्यंत १० विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.
सिंदेखड राजातील जंगलात वन पर्यटनाला संधी
सिंदखेडराजा : शहर परिघात असलेल्या जंगलात वन पर्यटन आणि बंदिस्त प्राणी उद्यान केल्यास भविष्यात याला मोठे महत्त्व प्राप्त होऊ शकते. राजकीय आणि प्रशासनिक व्यवस्थेने हा विषय गांभीर्याने घेण्याची गरज आहे.
लिंबू, संत्र्यांचे भाव वाढले
बुलडाणा : कोरोना महामारीत प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी लिंबू, संत्री, मोंसबी प्रभावी ठरतेय. त्यामुळे या तिन्ही रसवर्गीय फळांच्या किमतींत कमालीची वाढ झाल्याचे दिसून येते. बाजारात लिंबूचे भाव तर गगनाला भिडत असल्याचे चित्र आहे.