नांदुर्यात एकीकडे मुख्यमंत्र्यांची सभा तर दुसरीकडे गोंधळ!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 01:01 AM2017-12-18T01:01:25+5:302017-12-18T01:02:11+5:30
नांदुरा: नांदुरा तालुक्यातील जिगाव प्रकल्पाच्या कामाचा शुभारंभ करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय रस्तेबांधणी, महामार्ग व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी हे आले होते. त्यांची सभा सुरू होण्यापूर्वी व सभा सुरू असताना सभास्थळी गोंधळ निर्माण झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदुरा: नांदुरा तालुक्यातील जिगाव प्रकल्पाच्या कामाचा शुभारंभ करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय रस्तेबांधणी, महामार्ग व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी हे आले होते. त्यांची सभा सुरू होण्यापूर्वी व सभा सुरू असताना सभास्थळी गोंधळ निर्माण झाला. पोलिसांनी धाव घेतल्याने प्रकरण शांत झाले. हा प्रकार रविवारी, शहरातील कोठारी विद्यालय प्रांगण व परिसरात घडला.
मुख्यमंत्री रविवारी शहरात आहेत याची माहिती काँग्रेस व मनसे कार्यकर्त्यांना होती. शे तकर्यांच्या प्रश्नांवर जाब विचारण्याच्या व काळे झेंडे दाखविण्याच्या तयारीत होते. राज्या तील शेतकर्यांच्या प्रश्नांवर शासन गंभीर नसून, संकटातील शेतकर्यांना वाचविण्यासाठी कोणतेही ठोस पाऊले उचलल्या जात नाहीत. तसेच ज्या जिगाव प्रकल्पासाठी मंत्रिमहोदय येत आहेत त्या जिगाव धरणग्रस्तांचेही प्रश्न ‘जैसे थे’च आहेत.
त्यामुळे मुख्यमंत्र्यासह इतर मंत्र्यांना या विषयी जाब विचारत काळे झेंडे दाखविण्यात येणार असल्याच्या माहितीवरुन नांदुरा पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या सभेच्या आधीच नांदुरा येथील काँग्रेसचे ता.अ. भगवान धांडे, शहर अध्यक्ष अँड. मोहतेशाम रजा, वि.स.अ. नीलेश पाऊलझगडे, युवा नेते गौरव पाटील, ज्ञानेश्वर डामरे, विनल मिरगे, राजेश पोलाखरे, शुभम ढवळे, अक्षय वनारे, गजानन वानखडे, सुभाष मुकुंद, शरद मुकुंद, डिगांबर मुकुंद, विजय देशमुख, मनसेचे श्रीकृष्ण सपकाळ, गणेश धामोडकर यांना नांदुरा पोलिसांनी ताब्या त घेतले व पोलीस व्हॅनमधून खामगाव पोलीस स्टेशन येथे स्थानबद्ध केले.
राज्यात दारूबंदी करा!
बुलडाणा जिल्हा व महाराष्ट्र राज्यात दारूबंदी करा. दारूमुक्ती करा, नाही तर आमदार, मु ख्यमंत्र्यांना करू गावबंदी. आता बजावून सांगतो. नाही तर वाजवून सांगू, अशा घोषणा दारूमुक्ती आंदोलनाच्या पदाधिकार्यांनी देण्यास सुरुवात केली. हा प्रकार सुरू असतानाच पोलिसांनी कार्यकर्त्यांना स्थानबद्ध केले. यामध्ये प्रेमलता सोनोने, डॉ. अशोक काबरा, भाई रजनीकांत, अर्जुन कल्याणकर आदींनी सहभाग घेतला. पोलिसांनी त्यांना ४ वाजेनंतर सोडून दिले.