लोकमत न्यूज नेटवर्कचिखली : एका प्रवासी अॅपेने चिखलीकडे येत असताना अज्ञात वाहनाने कट मारल्याने अॅपेतून खाली पडून गंभीर जखमी युवकाचा मृत्यू झाल्याची घटना २७ एप्रिल रोजी घडली. या अपघातात मृत्यू पावलेला युवक शे. अलीम शे.सलीम रा. आनंदनगर चिखली हा २७ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास एका प्रवासी अॅपे वाहनातून अॅपे क्र. एमएच २८ एच ४३१६ ने मेरा बु. येथून चिखलीकडे येत असताना चिखली-दे.राजा रोडवरील हनुमान मंदिराजवळ एका अज्ञात वाहनाने अॅपेस कट मारल्याने या अॅपेत बसलेल्या शे.अलीम शे.सलीम यास पायाजवळ गुप्तांगास जबर मार लागून तो अॅपेतून खाली पडला. याबाबत शे.शकील रशिद रा.मेरा बु. यांनी दिलेल्या माहितीवरून अन्वरशहा अकबरशहा व नगरसेवक मो.आसिफ यांनी त्यास गंभीर जखमी अवस्थेत स्थानिक ग्रामीण रुग्णालयात आणले; मात्र त्याची स्थिती गंभीर असल्याने त्यास बुलडाणा येथे रेफर करण्याचा सल्ला वैद्यकीय अधिकाºयांना दिला; परंतु वेळ कमी असल्याने त्याच्या नातेवाइकांनी त्यास प्रारंभी येथील खासगी रुग्णालयात व त्यानंतर औरंगाबाद येथे उपचारार्थ नेत असताना रस्त्यातच त्याची प्राणज्योत मालवली. याप्रकरणी शे.नासिर शे.गणी वय ५० यांनी चिखली पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृतक शे.अलीम शे.सलीम याच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन वर्षांची मुलगी व अवघ्या सहा महिन्यांचा एक मुलगा तसेच एक भाऊ, दोन बहिणी असा परिवार आहे.
दुचाकी अपघातात दोन ठार अंढेरा : दुचाकी अपघातात दोन जण ठार तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना २६ एप्रिल रोजी रात्री आठ वाजता मलकापूर- अंढेरा मार्गावरील शिवणी अरमाळ नजीक घडली.पिंपळवाडी येथील भाजपचे पदाधिकारी नामदेव गालट हे पत्नीसह पाडळी शिंदे येथून नानमुखाचा कार्यक्रम आटोपून घरी जात होते. दरम्यान शिवणी अरमाळ नजीक त्यांच्या दुचाकी (क्र. एम. एच. २८ एल. ४३४९ ) ला समोरुन येणाºया दुचाकी क्र.( एम. एच. २८ टी. ३७१७) ने धडक दिली. या अपघातात नामदेव गालट व विजय जाधव गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी नेत असताना दोघांचाही रस्त्यातच मृत्यू झाला.