पूरग्रस्तांना मदत नव्हे, तर कर्तव्य भावनेतून त्यांनी जलप्रलयाने बिकट स्थितीत असलेल्या कोकण विभाग, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, कोल्हापूर, सांगली या भागात मदत पोहचविण्याची संकल्पना तालुका प्रमुख कपिल खेडेकर यांनी मांडली असता, सर्व पदाधिकाऱ्यांनी तातडीने पुढाकार घेतला. खा. प्रतापराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली चिखली शिवसेना, युवासेना पदाधिकारी आणि चिखलीतील काही दानशूरांच्या सहकार्याने तालुक्यातून १०१ क्विंटल गहू व किराणा साहित्याची मदत तातडीने जमा केली. हे साहित्य एसटी महामंडळाच्या कार्गो सेवेद्वारे रवाना करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पूरग्रस्तासाठी धान्य साहित्य घेऊन जाणाऱ्या या कार्गो वाहनाला हिरवा झेंडा दाखवून रवाना करण्यात आले. या मदतीसाठी शिवसेना नेते प्रा.नरेंद्र खेडेकर, शिवसेना नेते भास्करराव मोरे, उपजिल्हाप्रमुख शिवाजीराव देशमुख, तालुकाप्रमुख कपिल खेडेकर, शहरप्रमुख श्रीराम झोरे, युवासेना उपजिल्हाप्रमुख रोहित खेडेकर, युवासेना तालुकाप्रमुख नंदू कऱ्हाडे, शहर संघटक प्रीतम गैची, वाहतूक सेनेचे अध्यक्ष संजय हाडे, युवासेना शहरप्रमुख विलास घोलप, माजी नगरसेवक शाम शिंगणे, आनंद गैची, उपतालुकाप्रमुख किसनराव धोंडगे, विलास सुरडकर, लालसिंग मोरे, विश्वासराव खंडागळे, मनोज वाघमारे, समाधान जाधव, दत्ता देशमुख, रवी पेटकर, बाजार समितीचे संचालक गजानन पवार, बंटी कपूर, सुनील रगड, प्रवीण सरदड, प्रल्हाद वाघ, बंटी लोखंडे, पप्पू परिहार, राम माळोदे, सतनामसिंग वधवा, प्रकाश ठेंग, मंगेश ठेंग, अरुण सुरडकर आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला होता.
शिवसेनेने जोपासली माणुसकी
पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण किनारपट्टीवरील जलप्रलयात मोठ्या प्रमाणावर हानी झालेली आहे. शिवसेनेने तातडीने पुढाकार घेत पूरग्रस्तांच्या मदतीसाठी चिखलीतून सर्वात आधी मदतीचा हात पुढे केला आहे. या अनुषंगाने धान्य व किराणा साहित्याचे वाहन रवाना केले असल्याने शिवसेनेने माणुसकी जपत घेतलेल्या या पुढाकाराचे सर्वत्र कौतूक होत आहे.