नळगंगा नदीत पडलेल्या मुलाला वाचविले; चार युवकांचे धाडस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2019 02:58 PM2019-08-09T14:58:55+5:302019-08-09T15:00:56+5:30

ओम नामक १४ वर्षीय मुलगा पुलाच्या कडेला खाली नदीपात्रात पडुन पुलाखालील पाइपातून जवळपास तीनशे ते चारशे फूट वाहत गेला.

Child rescued in river Nalganga; The courage of four youths | नळगंगा नदीत पडलेल्या मुलाला वाचविले; चार युवकांचे धाडस

नळगंगा नदीत पडलेल्या मुलाला वाचविले; चार युवकांचे धाडस

googlenewsNext


लोकमत न्यूज नेटवर्क
मलकापूर : नदीला आलेला पूर पाहत असताना पाय निसटून पाण्यात वाहणाºया एका १४ वर्षीय मुलाचे प्राण चार धाडसी युवकांनी वाचविल्याची घटना ८ आॅगस्ट रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास काशीपुरा परिसरातील नळगंगा नदीपात्रा वर घडली.
मंगल गेट येथील गजानन काचकुटे यांचा एकुलता एक ओम नामक १४ वर्षीय मुलगा हा नळगंगा नदीपात्राला आलेला पूर पाहण्याकरिता काशीपुरा पुलावर मित्रांसमवेत गेला होता. दरम्यान पुलावरून त्याचा पाय निसटून तोल गेला व तो पुलाच्या कडेला खाली नदीपात्रात पडुन पुलाखालील पाइपातून जवळपास तीनशे ते चारशे फूट वाहत गेला.
हि बाब नदीपात्रवर उभे असलेल्या काही तरुण व नागरिकांच्या निदर्शनास आली असता या लोकांनी आरडाओरड करीत मुलगा बुडत असल्याचे एकमेकांच्या निदर्शनास आणून दिले.
दरम्यान नदीकाठी उभे असलेले मुस्तफा खान ,अब्दुल हमीद खान , हारून खान व संतोष सरदार या तरुणांनी कसलाही विचार न करता नदीपात्रात पटापट उड्या घेतल्या व त्या मुलाला सुखरूप बाहेर काढले.
बाहेर काढताच स्थानिक नगरसेवक राजू पाटील व रामेश्वर गोरले सह इतर तरुणांनी त्याला तात्काळ डॉ.अरविंद कोलते यांच्या खाजगी रुग्णालयात उपचारार्थ भरती केले. येथे त्याच्यावर उपचार करण्यात येऊन त्याला काही वेळाने तब्येत बरी असल्यामुळे सुट्टी देण्यात आली हे विशेष!
(प्रतिनिधी)

Web Title: Child rescued in river Nalganga; The courage of four youths

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.