मंडळ अधिकाऱ्याला दहा हजाराची लाच घेताना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2019 03:16 PM2019-11-26T15:16:09+5:302019-11-26T15:16:09+5:30

कैलास निनाजी जवरे (वय ५३) असे त्या कर्मचाºयाचे नाव आहे.

 Circle officer arrested for taking Rs 10,000 bribe | मंडळ अधिकाऱ्याला दहा हजाराची लाच घेताना अटक

मंडळ अधिकाऱ्याला दहा हजाराची लाच घेताना अटक

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदुरा : शेतीच्या नोंदीसाठी दहा हजार रुपयाची लाच मागणाºया मंडळ अधिकाºयास अकोला लाच लुचपत विभागाने २५ नोव्हेंबररोजी दुपारी रंगेहाथ पकडले. कैलास निनाजी जवरे (वय ५३) असे त्या कर्मचाºयाचे नाव आहे.
नांदुरा शहरातील हायवेला लागून असणाºया गणी पेट्रोल पंपाजवळ सापळा रचून दहा हजारांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली आहे. अकोला शहरातील मोठी उमरी भागात राहणारे निखिल थारकर यांना त्यांच्या शेतीच्या नोंदीसाठी महाळुंगी मंडळाचे मंडळ अधिकारी कैलास निनाजी जवरे यांनी दहा हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अकोला यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पंचांसमक्ष २० नोव्हेंबरला पडताळणी करण्यात आली होती. त्यानंतर २५ नोव्हेंबरच्या दुपारी बारा वाजेदरम्यान लाचलुचपत प्रतिबंध विभागाने शहरातील गणि पेट्रोल पंपासमोर उपलेटा आॅटो पार्ट्स जवळ सापळा रचण्यात आला. महाळुंगी मंडळाचे मंडळ अधिकारी कैलास निनाजी जवरे हे सापळ्यात अडकले. त्यांना दहा हजार रुपयाची लाच घेतांना रंगेहाथ पकडण्यात आले. काही महिन्यांपूर्वीच शहरात मुख्याधिकारी व अकाऊंटंट यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून केलेल्या कारवाईनंतर आता महसूल विभागाचा मासा सुद्धा गळाला लागल्याने कर्मचारी सर्वसामान्यांना किती वेठीस धरत आहेत ही चचार्सुद्धा नागरिकांमध्ये रंगत आहे.
 

Web Title:  Circle officer arrested for taking Rs 10,000 bribe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.