वातावरणातील बदलाने होरपळताहेत बुलडाणा जिल्ह्यातील उन्हाळी पीके!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2018 05:34 PM2018-04-09T17:34:44+5:302018-04-09T17:34:44+5:30

बुलडाणा : वातावरणात अचानक होत असलेल्या या बदलामुळे जिल्ह्यातील २ हजार ४६५ हेक्टर क्षेत्रावरील उन्हाळी पिके होरपळून निघत आहेत.

 Climate change in the Buldhana Summer crop damaged | वातावरणातील बदलाने होरपळताहेत बुलडाणा जिल्ह्यातील उन्हाळी पीके!

वातावरणातील बदलाने होरपळताहेत बुलडाणा जिल्ह्यातील उन्हाळी पीके!

Next
ठळक मुद्दे जिल्ह्यात एकूण २ हजार ४६५ हेक्टर क्षेत्रावर मका, सुर्यफुल, भुईमुंग, तीळ, मुंग व इतर उन्हाळी पिकांची पेरणी करण्यात आली आहे. वातावरणात अचानक होत असलेल्या या बदलामुळे जिल्ह्यातील २ हजार ४६५ हेक्टर क्षेत्रावरील उन्हाळी पिके होरपळून निघत आहेत.


- ब्रम्हानंद जाधव
बुलडाणा : गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात वातावरणात अचानक बदल झाला असून, कधी ढगाळ वातावरण निर्माण होऊन पावसाच्या तुरळक सरी बरसत आहेत; तर कधी अचानक उन्हाचा पार वाढत आहे. वातावरणात अचानक होत असलेल्या या बदलामुळे बुलडाणा जिल्ह्यातील २ हजार ४६५ हेक्टर क्षेत्रावरील उन्हाळी पिके होरपळून निघत आहेत. त्याचरबरोबर जलपातळी खालावल्याने हजारो हेक्टरवरील पिकांवर जलसंकट घोंगावत आहे.
जिल्ह्यात गेल्या काही वर्षापासून उन्हाळी पिकांकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. ज्यांच्याकडे ओलीताची सोय आहे, असे जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी सध्या उन्हाळी पिके घेत आहेत. उन्हाळी पिकांचे सरासरी क्षेत्र १ हजार ८१० असून यात दुपटीने वाढ झाल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात एकूण २ हजार ४६५ हेक्टर क्षेत्रावर मका, सुर्यफुल, भुईमुंग, तीळ, मुंग व इतर उन्हाळी पिकांची पेरणी करण्यात आली आहे. जळगाव तालुक्यात सरासरी क्षेत्र २३० हेक्टर असून, ३२० हेक्टर क्षेत्रावर उन्हाळी पिकांची पेरणी झाली आहे. चिखली तालुक्यात २० हेक्टर सरासरी क्षेत्रापैकी १८२ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. बुलडाणा तालुक्यात १४० हेक्टर सरासरी क्षेत्रापैकी ६२.४ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. देऊळगाव राजा तालुक्यात ४० हेक्टर सरासरी क्षेत्रापैकी ६६८.५ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. मेहकर तालुक्यात २४० हेक्टर सरासरी क्षेत्रापैकी ६०४ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. सिंदखेड राजा तालुक्यात नियोजन नसतांनाही १३५ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. लोणार तालुक्यात २२० हेक्टर सरासरी क्षेत्रापैकी ४४.५ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. खामगाव तालुक्यात ३५० हेक्टर सरासरी क्षेत्रापैकी ९७ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. मलकापूर तालुक्यात ४० हेक्टर सरासरी क्षेत्रापैकी ४२ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. मोताळा तालुक्यात ४० हेक्टर सरासरी क्षेत्रापैकी १९०.५ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. नांदुरा तालुक्यात नियोजन नसतांनाही ११९ हेक्टर क्षेत्रावर उन्हाळी पिकांची पेरणी झाली आहे. मात्र सध्या वातावरणातील बदलाचा परिणाम पिकांवर होत आहे. उन्हाची तिव्रता वाढत असताना अचानक ढगाळ वातावरण निर्माण होऊन पावसाच्या सरी बरसत असल्याने उन्हाळी पिकांना फटका बसत आहे.

Web Title:  Climate change in the Buldhana Summer crop damaged

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.