वातावरणातील बदलांचा आंब्याला फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:32 AM2021-04-15T04:32:21+5:302021-04-15T04:32:21+5:30
आंबा उत्पादक संकटात धामणगाव धाड : जिल्ह्यात दोन ते तीन दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे आंबा उत्पादकांसह इतर शेतकऱ्यांची चिंता वाढली ...
आंबा उत्पादक संकटात
धामणगाव धाड : जिल्ह्यात दोन ते तीन दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे आंबा उत्पादकांसह इतर शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे़. कडक उष्णता व पहाटे गार हवा सुटत असून, या बदलत्या वातावरणामुळे पिकांवर दुष्परिणाम होत आहेत़.
सध्या उन्हाळ्याचे दिवस असून, कलिंगड, खरबूज, आंबा या फळांचा हंगाम आहे़. बदलते हवामान, अवकाळी पाऊस यामुळे फळ पिकावर दुष्परिणाम होत असून, आंब्याच्या कैऱ्या खाली पडत आहेत़. त्यामुळे यंदाही आंब्याचा हंगाम वाया जाण्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत़. ढगाळ वातावरण, तर काही ठिकाणी अवकाळी पावसाच्या सरी पडत असल्याने याचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असून, कोरोना संसर्ग वाढण्याची भीतीही शेतकरी व्यक्त करीत आहे़त.