लोकमत न्यूज नेटवर्कपोरज / पिंपळगाव राजा : जिल्हाधिकारी डॉक्टर निरुपमा डांगे यांनी मौजे नांद्री व दिवठाणा येथील अतिवृष्टीमुळे खराब झालेल्या शेतातील कपाशी, ज्वारी, सोयाबीन पिकांची २९ आॅक्टोबर रोजी पाहणी करत तातडीने पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.दरम्यान, नांद्री येथील शेतकरी समाधान मुका डोमाळे यांच्या कपाशी पिकाची पाहणीही त्यांनी केली. दुपारी अडीच वाजेच्या सुमारास दिवठाणा येथील शेतकरी जगन्नाथ जोहरी यांच्या ज्वारी पिकाची पाहणी केल्यानंतर शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानाची प्रत्यक्ष जाणीवच जिल्हाधिकारी डॉ. निरुपमा डांगे यांना झाली.दुसरीकडे शेतकºयांनी सुद्धा पीक विमा काढला असल्यास कृषी विभागाकडे अर्ज सादर करावे, असे आवाहन त्यांनी दिवठाणा, नांद्री येथे जमलेल्या शेतकºयांना केले. यावेळी त्यांच्या समवेत मंडळ कृषी अधिकारी सुनील पवार, तहसीलदार चव्हाण, तलाठी खान, कृषी सहाय्यक सोनोने, दिवठाणा येथील शेतकरी सुभाष वाकुडकार, ज्ञानेश्वर राहणे, अनिल मुंढे, अनंता वाकुडकार, एकनाथ अहिर, ज्ञानेश्वर वाकुडकार, मुकेश हेलोडे, नाना हटकर व परिसरातील निमकवळा, काळेगाव, नांद्री, दिवठाणा, रोहणा येथील शेतकरी उपस्थित होते.(वार्ताहर)
जिल्हाधिकाऱ्यांनी केली ज्वारी, सोयाबीन पिकांची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2019 2:22 PM