अंजली दमानिया यांच्या विरोधात तक्रारींचा ओघ सुरूच; खामगावात तीन तक्रारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 06:44 PM2018-06-18T18:44:40+5:302018-06-18T18:44:40+5:30
लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: मुंबई येथील सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्या विरोधात खामगाव येथील पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्याचा ओघ सोमवारीही सुरूच होता.
लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: मुंबई येथील सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्या विरोधात खामगाव येथील पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्याचा ओघ सोमवारीही सुरूच होता. शनिवारी माधव पाटील यांच्या तक्रारीनंतर आता दोघांनी दमानिया यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.
माजी मंत्री एकनाथ खडसे यांना खोट्या गुन्ह्यात अडकविण्यासाठी न्यायालयाची फसवणूक केल्याप्रकरणी अंजली दमानिया यांच्यावर कारवाई केली जावी, अशी मागणी या तक्रारींमध्ये करण्यात आली असून, सोमवारी बोरी अडगाव येथील अच्युतराव पुरूषोत्तम टिकार यांनी शहर पोलिस स्टेशनमध्ये तर अभिमन्यू त्र्यंबक पांढरे यांनी हिवरखेड पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.
यामध्ये माजी मंत्री खडसे यांना खोट्या गुन्ह्यामध्ये फसविण्याच्या उद्देशाने चोपडा अर्बन को-आॅप बँक लि.चोपडा या बँकेचे खोटे चेक अस्तित्वात आणले. हे चेक खरे म्हणून सुध्दा न्यायालयात वापरले. त्यामुळे अंजली दमानिया यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी या तक्रारींमध्ये करण्यात आली आहे.