शेगावात भुयारी रेल्वेमार्गाचे काम पूर्णत्वास; दोन पैकी एका भुयारी मार्गाचे काम पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 01:29 AM2017-12-26T01:29:04+5:302017-12-26T01:29:16+5:30
शेगाव : येथील चारमोरी व दोनमोरींच्या मधोमध दोन भुयारी मार्गांची निर्मिती रेल्वे प्रशासनाच्या वतीने केल्या जात असून त्यामधील एका भुयारी मार्गाचे काम पूर्ण झाले आहे. तर दुसर्या भुयारी मार्गाचे काम १0 दिवसांनी सुरू होणार असल्याची माहिती रेल्वे विभागाकडून देण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क

उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर विकास आराखड्यामधून रेल्वे विभागाकडून दोनमोरी व चारमोरीच्या मधोमध भाविक भक्तांच्या सोयीसाठी रेल्वे रूळाखालून भुयारी मार्गाच्या निर्मितीचे काम हाती घेण्यात आले आहे. याठिकाणी दोन भुयारी मार्ग बांधण्यात येत असून एका मार्गाचा जाण्यासाठी तर दुसर्या मार्गाचा येण्यासाठी वापर केल्या जाणार आहे. मागील आठवडाभरापासून प्रत्यक्ष भुयार निर्मितीचे काम सुरू असून एका भुयारी मार्गाची निर्मिती पूर्ण झाली आहे. तर दुसर्या बोगद्याचे काम दहा दिवसानंतर सुरू करण्यात येणार आहे. रेल्वे विभागाकडून त्याकरीता पूर्वतयारी केल्या जात आहे.
हे भुयारी मार्ग नवीन पध्दतीने केल्या जात असून सिमेंटचे ढाचे रूळाखाली टाकण्यात येवून बोगदा तयार केल्या जात आहे. या बोगद्यांमधून दुचाकी, ऑटो, लहान वाहने सहज जाऊ शकणार आहेत. अशाच प्रकारचे भुयारी मार्ग अकोट रोडवरील बंद झालेल्या गेटच्या जागीही करण्यात यावी अशी मागणी प्रभाग १ व २ मधील नागरिकांकडून केल्या जात आहे.