लेखी आश्वासनाने रिपाइंच्या उपाेषणाची सांगता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:35 AM2021-09-19T04:35:42+5:302021-09-19T04:35:42+5:30
विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी बुलडाणा : अंढेरा येथील महावितरण कार्यालयात विश्वकर्मा जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सर्वप्रथम भूषण ...
विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी
बुलडाणा : अंढेरा येथील महावितरण कार्यालयात विश्वकर्मा जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सर्वप्रथम भूषण पन्हाळे यांच्या हस्ते हार अर्पण करून विश्वकर्मा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी महावितरणचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित हाेते़
हाेमगार्डच्या विविध मागण्यांसाठी निवेदन
बुलडाणा : कर्तव्यावर असताना मृत्यू पावल्यास हाेमगार्डच्या वारसांना २५ लाख कृतज्ञता निधी आणि त्यांच्या वारसांना अनुकंपा तत्त्वावर शासकीय सेवेत सामावून घ्या, अशी मागणी होमगार्डचे माजी समादेशक प्रा. जगदेवराव बाहेकर यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे़
भ्रष्टाचार निर्मूलन समितीच गुरुवारी सभा
बुलडाणा : जिल्हास्तरीय भ्रष्टाचार निर्मूलन समिती सभा २३ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. ज्या व्यक्तींना भ्रष्टाचाराबाबतच्या तक्रारी व गाऱ्हाणी दाखल करावयाच्या असतील त्यांनी प्रतिज्ञापत्रावर तक्रार स्पष्ट शब्दात सबळ पुराव्यानिशी समितीसमोर दाखल कराव्यात, असे आवाहन तहसीलदार प्रिया सुळे यांनी केले आहे.
ई पीक नाेंदणीविषयी मार्गदर्शन
बुलडाणा : ई पीक नाेंदणीसाठी शेतकऱ्यांना उद्भवणाऱ्या अडचणी लक्षात घेता देऊळगाव राजा तहसीलने पुढाकार घेतला आहे. अंढेरा मंडळातील पाडळी शिंदे येथे नायब तहसीलदार विकास राणे यांनी शेतकऱ्यांच्या पीक पेरा नोंदणीबाबतच्या अडचणी जाणून घेत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.