अ. भा. कॉंग्रेस कमिटी अंतर्गत राजीव गांधी पंचायत राज अभियान देशभरात राबविण्यात येत आहे. याअंतर्गत चिखली आयोजित सर्वोदय संकल्प शिबिराला राजीव गांधी पंचायत राज संघटनच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा माजी खासदार मीनाक्षी नटराजन, राष्ट्रीय उपाध्यक्ष माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ, राष्ट्रीय समन्वयक ब्रजभूषण पांडे यांची प्रमुख मार्गदर्शक म्हणून या शिबिरास उपस्थिती होती. शिबिराचा शुभारंभ व समारोप काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्या हस्ते अ. भा. काँग्रेसच्या ध्वजाचे रोहण करून व राष्ट्रगीताने पार पडला. शिबिराला जिल्हाभरातून मोठ्या संख्येने शिबिरार्थी उपस्थित होते. गाधींजींना अभिप्रेत पंचायतराज प्रणाली तळागाळातल्या माणसापर्यंत पोहोचविण्याचा संकल्प या शिबिरात करण्यात आला. प्रमुख मार्गदर्शकांनी विविध विषयांबाबत सखोल मार्गदर्शन केले, तर शिबिरार्थींनी राजीव गांधी पंचायतराज प्रणालीला स्वत:पुरते मर्यादित न ठेवता ग्रामीण व शहरी भागातील तळागळातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचविण्याचा संकल्प केला. जिल्ह्यातील काँग्रेसचे सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिबिरासाठी उपस्थिती दर्शविली.
दोन दिवसीय सर्वोदय संकल्प शिबिराची सांगता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2021 4:35 AM