बांधकाम विभाग अभियंत्यांची खुर्ची छताला टांगली; मनसेचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 01:12 AM2018-03-15T01:12:17+5:302018-03-15T01:12:17+5:30

चिखली : नगरपालिका अंतर्गत होत असलेली विविध विकास कामांच्या निकृष्ट दर्जाची चौकशीसाठी बांधकाम विभागाकडून हेतुपुरस्सरपणे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करीत मनसे पदाधिकाºयांनी १४ मार्च रोजी येथील सार्वजनिक बांधकाम विभागातील अभियंत्यांची खुर्ची छताला टांगून आपला रोष व्यक्त केला.

Construction Department engineers hanging on the chairs; MNS movement | बांधकाम विभाग अभियंत्यांची खुर्ची छताला टांगली; मनसेचे आंदोलन

बांधकाम विभाग अभियंत्यांची खुर्ची छताला टांगली; मनसेचे आंदोलन

Next
ठळक मुद्देमनसे पदाधिका-यांनी व्यक्त केला रोष

लोकमत न्यूज नेटवर्क
चिखली : नगरपालिका अंतर्गत होत असलेली विविध विकास कामांच्या निकृष्ट दर्जाची चौकशीसाठी बांधकाम विभागाकडून हेतुपुरस्सरपणे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करीत मनसे पदाधिका-यांनी १४ मार्च रोजी येथील सार्वजनिक बांधकाम विभागातील अभियंत्यांची खुर्ची छताला टांगून आपला रोष व्यक्त केला.
शहरामध्ये नगरपालिकेंतर्गत होत असलेल्या रस्ते, नाल्या, शौचालये आदी विकास कामे अत्यंत निकृष्ट दर्जाची होत असल्याचा आरोप करून या कामांच्या चौकशीची मागणी मनेसेचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश बरबडे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती. त्यानुषंगाने जिल्हाधिकाºयांनी सार्वजनिक बांधकाम विभाग चिखली यांना चौकशीचे आदेश दिले आहेत; मात्र जिल्हाधिकारी यांचे आदेश होऊन बरेच दिवस झाले असतानादेखील सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप मनसेच्या पदाधिकाºयांनी केला असून, याबाबत संबंधितांची भेट घेऊन चौकशी त्वरित करण्याची मागणी करूनही सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी टाळाटाळ करीत असल्याने मनसेचे जिल्हाध्यक्ष मदनराजे गायकवाड व पदाधिकारी चौकशीसाठी गेले असता सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये कोणीच हजर नसल्यामुळे ते हेतुपरस्सरपणे टाळाटाळ करीत असल्याचा आरोप करीत पदाधिकाºयांनी उपविभाग अभियंत्यांची खुर्ची त्यांच्या कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर टांगून आपला रोष व्यक्त केला. त्यावेळी जिल्हाध्यक्ष गायकवाड, जिल्हा उपाध्यक्ष बरबडे, मनविसे जिल्हा उपाध्यक्ष शैलेंद्र कापसे, मनसे शेतकरी सेलचे जिल्हा संघटक प्रदीप भवर, राजेश परिहार, अंकित कापसे, प्रकाश गुळवे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.  
 

Web Title: Construction Department engineers hanging on the chairs; MNS movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.